Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedफेव्हीक्रिल आर्ट चॅप्टर उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

फेव्हीक्रिल आर्ट चॅप्टर उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे,2 फेब्रुवारी 2026 : भारतातील लोकप्रिय आर्ट ॲन्ड क्राफ्ट ब्रँड असलेल्या फेव्हीक्रिल तर्फे आयोजित द आर्ट चॅप्टर – सेलिब्रेटिंग द लोकल या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारतातील स्थानिक कला समुदायाला सक्षम करणे,प्रोत्साहन देणे या उद्देशाने सुरू करण्यात आलेला हा पहिलाच उपक्रम आहे. नुकतेच पुण्यातील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे पार पडलेल्या प्रदर्शनाला 3000 हून अधिक कला रसिकांनी भेट दिली.

 

या प्रदर्शनात 80 हून अधिक कलाकारांच्या कलाकृती सादर करण्यात आल्या होत्या.यामध्ये फेव्हीक्रिल सर्टिफाईड प्रोफेशनल्स (एफसीपी) तसेच निवडक नवोदित कलाकारांचा समावेश होता.पारंपरिक भारतीय कला प्रकारांपासून ते समकालीन व प्रयोगशील कला अभिव्यक्तीपर्यंत विविध शैलींचा या कलेक्शनमध्ये समावेश होता.द आर्ट चॅप्टर ने कलाकारांना कलाकृती प्रदर्शित करण्यासाठी,कलाप्रेमींशी संवाद साधण्यासाठी तसेच ओळख आणि पाठिंबा मिळविण्यासाठी एक अर्थपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

 

हा उपक्रम पुढील पिढीतील कलाकारांपर्यंत पोहचविण्यासाठी फेव्हीक्रील तर्फे 12 प्रतिष्ठित कला,फॅशन आणि डिझाईन महाविद्यालयांचा सहभाग असलेली विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेच्या माध्यमातून युवा प्रतिभेला प्रोत्साहन मिळाले व व्यावसायिक कला परिसंस्थेशी जोडले जाण्याची संधी उपलब्ध झाली

.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments