Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुरंदर येथे समाज कल्याण विभागांतर्गत राज्यस्तरीय कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उत्साहात...

पुरंदर येथे समाज कल्याण विभागांतर्गत राज्यस्तरीय कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उत्साहात आयोजन*

 

 

पुणे, दि. 03 फेब्रुवारी (जिमाका वृत्तसेवा) : समाज कल्याण विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात शासकीय निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन 2ते 6 फेब्रुवारी 2026 या कालावधीत अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींची शासकीय निवासी शाळा, दिवे (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे करण्यात आले आहे.

 

या स्पर्धांचे उद्घाटन आयुक्त, समाज कल्याण, दीपा मुधोळ मुंडे, यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सह आयुक्त (शिक्षण) प्रमोद जाधव, उपसंचालक (शिक्षण) निशादेवी बंडगर वंदना कोचुरे, तसेच विविध विभागांतील सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, विभागातील अधिकारी-कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

 

योवळी विविध विभागांतील सहभागी विद्यार्थिनींचे भव्य पथसंचलन झाले. या राज्यस्तरीय स्पर्धेत एकूण 294 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला आहे.

 

अध्यक्षीय भाषणात आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांनी विद्यार्थिनींना स्पर्धेसाठी शुभेच्छा देत खेळामध्ये खिलाडूवृत्ती जोपासण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांनी केले. प्रमोद जाधव, सह आयुक्त (शिक्षण) यांनीही विद्यार्थिनींना शुभेच्छा दिला. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांनी केले.

 

या स्पर्धांमध्ये फुटबॉल, 100, 200 व 400 मीटर धावणे, 4×100 मीटर रिले, लांब उडी, थाळीफेक, खो-खो, तसेच भूमिका अभिनय व लोकनृत्य अशा विविध क्रीडा व सांस्कृतिक प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धांसाठी पुणे जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील क्रीडा शिक्षक पंच म्हणून काम पाहत आहेत.

 

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments