Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorized*जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत ‘माध्यम समन्वयकाची भूमिका’ विषयावर मार्गदर्शन*

*जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत ‘माध्यम समन्वयकाची भूमिका’ विषयावर मार्गदर्शन*

 

 

*निवडणूक प्रकियेत माध्यम समन्वयकांनी चोखपणे जबाबदारी पार पाडावी-युवराज पाटील*

 

पुणे, दि.३: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकाच्यादरम्यान मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत ‘माध्यम समन्वयकाची भूमिका’ या विषयावर जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती सदस्य युवराज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिनस्त नियुक्त माध्यम समन्वयकांसोबत दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला.

 

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने माध्यम समन्वयकाची भुमिका महत्वपूर्ण; त्यामुळे माध्यम समन्वयकांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात, अशी सूचना श्री. पाटील यांनी केली.

 

यावेळी श्री. पाटील यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकाच्यादरम्यान प्रसारमाध्यमांसाठी असलेल्या सुविधा, माध्यम कक्षाचे कामकाज, प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मतदान व मतमोजणीच्या दिवशी देण्यात येणारी प्रवेशिका, प्रसार माध्यमांना वेळोवळी निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती उपलब्ध करुन देणे, मतदान व मत मोजणी केंद्रावरील घ्यावयाची दक्षता, उमेदवारांच्या जाहिरातीचे प्रमाणीकरण व संनियंत्रण, पेडन्यूज आदी विषयांबाबत मार्गदर्शन केले.

 

यावेळी उपस्थित माध्यम समन्वयकांच्यावतीने उपस्थित करण्यात आलेल्या शंकाचे निरसन करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments