Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्हा परिषद व पंचायत समिती मतदानाच्या दिवशी प्रचाराच्या जाहिरातींना बंदी-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी...

जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदानाच्या दिवशी प्रचाराच्या जाहिरातींना बंदी-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी 5 फेब्रुवारी रात्री 10 वाजता प्रचाराची समाप्ती

पुणे, दि. 4 : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठीच्या जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता होणार असून, त्यानंतर प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी म्हणजे 7 फेब्रुवारी 2026 रोजी मुद्रित माध्यमांतदेखील जाहिराती प्रसिद्ध करु नयेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी दिली आहे.

 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होत असून, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, 1961 चे कलम 28 ब (1) अन्वये, “कोणतीही व्यक्ती कोणत्याही मतदार विभागामध्ये, मतदानास सुरुवात होण्याच्या दिनांकापूर्वी चोवीस तासांमध्ये किंवा त्या मतदार विभागात निवडणुकीसाठी ज्या दिनांकास किंवा दिनांकास मतदान घेण्यात येईल. त्या दिनांकास किंवा दिनाकांस कोणतीही सार्वजनिक सभा बोलविणार नाही, भरविणार नाही किंवा अशा सभेस हजर राहणार नाही.

 

राज्य निवडणूक आयोगाने 9 ऑक्टोबर 2025 रोजी ‘निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रामाणन आदेश, 2025’ प्रसिद्ध केला आहे. या आदेशाच्या भाग आठमधील परिच्छेद 16 (घ) अन्वये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रचार समाप्तीनंतर आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे 7 फेब्रुवारी 2026 रोजी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा समाज माध्यमांमध्ये कुठल्याच प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नाहीत, परिच्छेद 16 (ग) अन्वये 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता संपेल. त्यानंतर प्रचारसभा, प्रचारफेऱ्या, ध्वनिक्षेपक इत्यादींसह अन्य प्रकारे जाहीर प्रचार करता येणार नाही,अशी माहिती श्री. डुडी यांनी दिली आहे.

 

000

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments