Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedकॅन्सर : आधार रेखा प्रतिष्ठान 

कॅन्सर : आधार रेखा प्रतिष्ठान 

 

 

आपल्याला कॅन्सर झाल्याचे कळताच संबधित व्यक्ति प्रचंड

घाबरून जाते. त्या व्यक्तिच्या घरची मंडळी देखील हवालदिल होऊन जाते. डॉक्टरांचे उपाय, रुग्णालयात उपचार करण्यात येतात. तेथील सर्व स्टाफ त्यांची ड्युटी बजावीत असतो.पण अशा या भयंकर परिस्थितीत महत्वाचे असते, ते म्हणजे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांचे मनोबल कायम ठेवणे,ते वाढविणे हे होय.

 

ही गरज ओळखून कॅन्सर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी “आधार रेखा प्रतिष्ठान” ही संस्था ठाण्यात स्थापन करण्यात आली आहे.

 

या संस्थेतर्फे पुढील उपक्रम चालवले जातात

1. कर्करुग्णांसाठी मोफत टॅक्सी सेवा- ठाणे ते टाटा हॉस्पिटल परळ व खारघर. ही योजना जानेवारी 2021 पासून चालू आहे आत्तापर्यंत अठराशेहून अधिक वेळा कर्करुग्णांना यांचा फायदा झाला आहे.

2. कर्क रुग्णांसाठी खास योग वर्ग – घंटाळी मित्र मंडळाच्या सहकार्याने , सहयोग मंदिर घंटाळी जवळ योग वर्ग चालू आहेत. 25 ते 30 जण याचा लाभ घेतात

3. दर बुधवारी कर्क योध्यांसाठी कर्कमैत्र या नावाने कार्यक्रम आयोजित केला जातो. यामध्ये विविध तज्ञांची व्याख्याने, विविध छंदांची जोपासना, याशिवाय वर्षभरात एकत्र नाटक, सिनेमा पाहणे, सहभोजन, सहलीला जाणे यासारख्या विविध कार्यक्रमांची रेलचेल असते.

4. आधार रेखा प्रतिष्ठानची स्वतःची लायब्ररी असून यामध्ये आरोग्य विषयक 100 ते 150 पुस्तके उपलब्ध आहेत.

5. आधार रेखा प्रतिष्ठान तर्फे कॅन्सर डिटेक्शन कॅम्पस नियमितपणे घेतले जातात

6. आधार रेखा प्रतिष्ठान तर्फे 22 सप्टेंबर कर्क योध्यांसाठी, त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी रोझ डे साजरा होतो. गुलाब पुष्प देऊन या रुग्णांचा सत्कार केला जातो.

7. आधार रेखा प्रतिष्ठानचे संस्थापक अरविंद जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अरविंद स्मृती व्याख्यानमाला होते. त्यामध्ये अनेक नामवंत येऊन आरोग्य विषयक भाषण देतात. गेल्या काही वर्षात उदय निरगुडकर, शरद पोंक्षे , वंदना अत्रे, डॉ अभिजीत सोनवणे, डॉ अंजली जोशी, डॉ राजेंद्र बडवे यांच्यासारखे नामवंत तज्ञ आले होते.

8. गरजू कर्करुग्णांना आर्थिक मदत केली जाते.

9. कर्करूग्ण व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी, मानसिक उपचार तज्ञांची ,मदत देवुन आधार संवाद मार्फत समुपदेशन केले जाते.

कै डॉ.एच एस भानुशाली , डॉक्टर अनिल हेरूर ,डॉक्टर अमोल भानुषाली आणि श्री श्रीनिवास मराठे, रश्मी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आधार रेखा प्रतिष्ठानचे कार्य सुरळीत चालू आहे

 

भविष्यात विस्ताराच्या काही योजना या संस्थेच्या आहेत.

जसे की संस्थेला स्वतःसाठी स्वतंत्र जागा मिळणे. कारण सध्या प्रत्येक उपक्रम हा विविध ठिकाणी घेतला जातो . कर्करुग्णांना औषधे व विविध प्रकारच्या लसी स्वस्तामध्ये उपलब्ध करून देण्याचा जसे कर्करुग्ण, कर्क योद्धे व कुटुंबीयांसाठी समुपदेशन आणि नऊ ते 14 वर्षाच्या मुलींसाठी HPV vaccination

याशिवाय नजीकच्या भविष्यात ठाणे शहर वा आसपास ,एक Palliative care unit चालू करण्याचा मनोदय आहे. या सगळ्यासाठी व्यक्तींचा व संस्थांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे.

 

आधार रेखा प्रतिष्ठान ठाणे ही कर्करुग्णांसाठी कार्यरत धर्मादाय आयुक्तांकडे नोंदलेली संस्था आहे.संस्थेला 80G व CSR number मिळाला आहे. त्यामुळे या संस्थेला दिलेल्या देणग्या करमुक्त आहेत .

 

दिवसेंदिवस कॅन्सर चे रुग्ण वाढत आहेत. कॅन्सर चे प्रकार ही वाढतच चालले आहेत. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता, ठिकठिकाणी आधार रेखा निर्माण होण्याची नितांत गरज आहे. चला तर मग या महान कार्यात आपण ही सहभागी

होऊ या!

लेखन:शुभांगी पासेबंद

ठाणे.

संपादन: देवेंद्र भुजबळ

-9869484800

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments