Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedलाळ खुरकत रोगाच्या निर्मुलनासाठी लसीकरण हाय प्रभावी उपाय पशुसंवर्धन विभागाचे...

लाळ खुरकत रोगाच्या निर्मुलनासाठी लसीकरण हाय प्रभावी उपाय पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

पुणे, दि. 05 फेब्रुवारी (जिमाका वृत्तसेवा) : लाळ खुरकत रोग हा गाय, म्हैस, शेळी व मेंढ्यांमधील अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य रोग असून त्याचा पशुधन उत्पादन व निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होतो. या रोगाच्या नियंत्रण व निर्मूलनासाठी केंद्रपुरस्कृत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सन 2030 पर्यंत लसीकरणाद्वारे लाळ खुरकत व सांसर्गिक गर्भपात हे दोन रोग निर्मूलनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

 

राज्यात 14 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत लाळ खुरकत लसीकरण फेरी–7 यशस्वीपणे पार पडली असून 159 लक्ष गो व म्हैस वर्गीय पशुधनांपैकी 153 लक्ष पशुधनांना लसीकरण करण्यात आले आहे. लाळ खुरकत रोगाचे संपूर्ण निर्मूलन होण्यासाठी दर सहा महिन्यांनी लसीकरण करणे आवश्यक आहे.

 

त्यानुसार 13 फेब्रुवारी ते 29 मार्च 2026 या कालावधीत लाळ खुरकत लसीकरण फेरी–8 राबविण्यात येणार असून आवश्यक लस व साधनसामग्रीचा पुरवठा केंद्र शासनामार्फत करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या मानक कार्यप्रणालीनुसार पंचायती राज संस्था, शहरी स्थानिक संस्था, सहकारी दुग्ध संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी पशुवैद्यक व पशुपालकांच्या सक्रिय सहभागातून ही मोहिम राबविण्यात येणार आहे.

 

पशुंचे आरोग्य जपण्यासाठी, रोगप्रसार रोखण्यासाठी व पशुपालकांचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सर्व पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून आपल्या गो व म्हैस वर्गीय पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. आणि आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.

 

 

 

00000

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments