Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedमिलिंद रथकंठीवार यांना "सारेगामा कला गौरव - कला रत्न पुरस्कार".

मिलिंद रथकंठीवार यांना “सारेगामा कला गौरव – कला रत्न पुरस्कार”.

 

पुणे

(प्रतिनिधी)

 

*सारेगामा सांस्कृतिक समूह* नागपूर पुणे,मुंबईचे संचालक डॉ संजय व डॉ वर्षा उत्तरवार नागपूर तर्फे महाराष्ट्रातील आर्य वैश्य समाजातील विविध क्षेत्रात नावलौकिक ठरलेल्या एकूण १४ गुणवंतांना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नावलौकिक प्राप्त “सारेगामा कल्चरल ग्रुप” तर्फे कलारत्न व कलागौरव २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून ह्या मध्ये पुणे येथील,”व्यक्ती एक! अभिव्यक्ती अनेक!!” चे सादरकर्ते,लेखक,सुप्रसिद्ध

रेखाचित्रकार,अभिवाचक,गायक मिलिंद रथकंठीवार यांचा समावेश आहे अशी माहिती ग्रुपचे प्रमुख आयोजक व नामवंत गायक डॉ संजय एस.उत्तरवार ह्यांनी दिली.

मिलिंद रथकंठीवार हे बँक ऑफ महाराष्ट्र मधील निवृत्त बँक अधिकारी असून अनेक पुरस्काराने सन्मानित झाले आहेत.त्यांनी रेखाटलेल्या अनेक रेखाचित्रांचे प्रदर्शने भरवली आहेत.स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्याचे ते अभ्यासक असून सावरकर साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.गुणवंत कामगार पुरस्कार ही प्राप्त झाला आहे.राज्य शासनाने त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.

डॉ संजय उत्तरवार पुढे म्हणाले पत्रकारिता,समाजसेवा,साहित्य, कला, नाट्य,संगीत,गायन,ललित लेखन,काव्य,शिक्षण,संशोधन, तंत्रज्ञान चित्रकला आदी क्षेत्रातील दिग्गज गुणवंतांची माहिती कुठलाही प्रस्ताव व शिफारसीविना सारेगामा कल्चरल ग्रुप नागपूर पुणे मुंबई ने जाहीर केली आहे. ह्यात चित्रकला मधे प्रकाश बेतावार नागपूर व विविध कला नैपुण्य मिलिंद रथकंठीवार पुणे,पत्रकारिते साठी आकाशवाणी दूरदर्शनचे सेवानिवृत प्रतिनिधी डॉ.विजय निलावार हिंगोली व जेष्ट्य पत्रकार व व्यंगचित्रकार बाबू गंजेवार कंधार,शैक्षणिक सुधारणा – डॉ.राजेश गादेवार नागपूर, सामाजिक संघटना नंदकुमार गादेवार अध्यक्ष महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा नांदेड, साहित्य – संपदा कुल्लुरवार नागपूर, नाट्य – अभय अंजिकर नागपूर, सामाजिक सुधारणा – कृषीभूषण दीपक आसेगावकर पुसद व लक्ष्मणराव उपगंनलावार नागपूर,गायन – उदय उमरीकर मुंबई,संशोधन अजिंक्य कोत्तावार येवतमाळ,दूरदृष्टी अभियंता – राजू मुक्कावार नागपूर, काव्य व ललित साहित्य – शुभांगी रथकंठीवार नागपूर ह्या गुणवंतांचा समावेश आहे.बुधवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी पाच ते आठ या वेळेत संगीत मेजवानी व आदरातिथ्य सह सारेगामा कल्चरल ग्रुप नागपूर पुणे मुंबई कडून व कला गौरव,कलारत्न पुरस्कार २०२५ ने सन्मानचिन्हासह सन्मानित करण्यात येणार आहे.असे आयोजक डॉ संजय शंकर उत्तरवार,संचालक सारेगामा सांस्कृतिक ग्रुप ह्यांनी माहिती दिली.

सारेगामा सांस्कृतिक ग्रुप हा जगविख्यात असून याचे लाखो फॉलोवर्स जगभर आहेत.आमचे कार्यक्रम ऑनलाईन सगळ्या सोशल मीडिया वर पण उपलब्ध आहेत असे पण त्यांनी सांगितले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments