एकत्रित महसुलात वर्ष-प्रति-वर्ष ३० टक्के वाढ होऊन तो १४,१८१ कोटी रुपयांवर
करानंतरचा एकत्रित नफा वर्ष-प्रति-वर्ष ४१ टक्क्यांनी वाढून ९८३ कोटी रुपयांवर
एकूण कर्जसमूह वर्ष-प्रति-वर्ष ३० टक्क्यांनी आणि अनुक्रमे ७ टक्क्यांनी वाढून १,९०,३८६ कोटी रुपयांवर
म्युच्युअल फंडाचे तिमाही सरासरी एयूएमः ४,४३,२३३ कोटी रुपये (वर्ष-प्रति-वर्ष १५ टक्के वाढ)
जीवन विम्याचा वैयक्तिक प्रथम वर्ष हप्ताः आर्थिक वर्ष २६ च्या नऊमाहीत ३,०७६ कोटी रुपयांवर (वर्ष-प्रति-वर्ष १९ टक्के वाढ)
आरोग्य विम्याचा एकूण लेखी हप्ताः आर्थिक वर्ष २६ च्या नऊमाहीत ४,६५१ कोटी रुपयांवर (वर्ष-प्रति-वर्ष ३९ टक्क्यांनी वाढ)
उद्योग प्लस हा एमएसएमईसाठीचा बीटूबी मंच विस्तारून ५,००० कोटी रुपये एयूएमचा टप्पा पार
एबीसीडी, डीटूसी मंच – ९.३ लाख ग्राहक
आदित्य बिर्ला हाउसिंग फायनान्सची वाढीचा वेग कायम ठेवण्यासाठी, तसेच बाजारातील हिस्सा वाढविण्यासाठी एडव्हेन्ट इंटरनॅशनलकडून गुंतवणुकीनंतरच्या मूल्यांकन आधारावरील १९,२५० कोटी रुपये मूल्यात २७५० कोटी रुपये वृद्धी भांडवल उभारणी
मुंबई, फेब्रुवारी ३, २०२६ : आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडने (द कंपनी) ३१ डिसेंबर २०२५ ला संपलेले नऊ महिने आणि तिमाहीचे लेखापरीक्षण न झालेले वित्तीय निकाल जाहीर केले.
एकत्रित महसुलात वर्ष-प्रति-वर्ष ३० टक्के वाढ होऊन तो १४,१८१ कोटी रुपयांवर पोहोचला. अपवादात्मक आणि एकमेव असलेले घटक वगळता, करानंतरचा एकत्रित नफा वर्ष-प्रति-वर्ष ४१ टक्क्यांनी वाढून ९८३ कोटी रुपयांवर गेला. एकूण कर्जसमूह (एनबीएफसी आणि एचएफसी) वर्ष-प्रति-वर्ष ३० टक्क्यांनी आणि अनुक्रमे ७ टक्क्यांनी वाढून ३१ डिसेंबर २०२५ ला १,९०,३८६ कोटी रुपयांपर्यंत गेला. एकूण एयूएम म्हणजे व्यवस्थापनाच्या अधिपत्याखालील मत्ता (एएमसी, जीवन विमा आणि आरोग्य विमा) वर्ष-प्रति-वर्ष १९ टक्क्यांनी वाढून ५,९८,१६६ कोटी रुपयांवर पोहोचला. जीवन विम्याचा वैयक्तिक प्रथम वर्ष हप्ता वर्ष-प्रति-वर्ष १९ टक्क्यांनी वाढून आर्थिक वर्ष २६ च्या नऊमाहीत ३,०७६ कोटी रुपयांवर गेला, तर आरोग्य विम्याचा एकूण लेखी हप्ता वर्ष-प्रति-वर्ष ३९ टक्क्यांनी वाढून आर्थिक वर्ष २६ च्या नऊमाहीत ४,६५१ कोटी रुपयांवर पोहोचला.
कंपनीचा डीटूसी मंच असलेला एबीसीडी २६ हून अधिक उत्पादने आणि सेवा देणारा सर्वंकष समूह आहे. त्यात आतापर्यंत चांगली वाढ होऊन ग्राहकसंख्या ९३ लाखांवर गेली आहे. एमएसएमईंसाठीचा (सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग) एकात्मिक बीटूबी मंच उद्योग प्लसचीही भरभराट झाली असून, त्यावर २४ लाख जणांची नोंदणी झाली आहे. तसेच, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत एयूएमने ५००० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.
कंपनीचा भारतभरात विस्तार सुरू असून, ३० नव्या शाखांची त्यात भर पडली आहे. त्यामुळे एकूण शाखांचे जाळे विस्तारून ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत १७४२ हे जाळे शाखांपर्यंत पोहोचले आहे.


