पुणे, 27 जानेवारी 2026 : मदर्स रेसिपी हा अनेक पिढ्यांपासून भारतीय कुटुंबांचा विश्वास असलेला भारतातील स्थानिक वारसा लाभलेला ब्रँड असून त्यांनी नवी डिजिटल फर्स्ट रेसिपी व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे. या सिरीजच्या माध्यमातून कोरियन प्रेरणेतून तयार होणारे पदार्थ आता रोजच्या भारतीय स्वयंपाकघरात सहज बनवता येणार आहेत. या सिरीजमध्ये अशा रेसिपीजवर भर देण्यात आला आहे ज्या कमी वेळेत समजणाऱ्या, तयार करायला सोप्या आणि भारतीय स्वयंपाकघरांसाठी अनुकूल आहेत. कोणतेही गुंतागुंतीचे घटक किंवा जास्त तयारी न करता घरच्या घरी बाहेरच्या देशातील पदार्थ कसे तयार करता येतात, हे या व्हिडिओ सीरिजमधून दाखवण्यात आले आहे.
लोकांकडून मिळणाऱ्या ऑर्डर, लोकांकडून पाहिल्या व केल्या जाणाऱ्या पाककृती यावर कोरियन चवींचा प्रभाव पाडत असताना घरच्या खानसाम्यांनाही एक परिचित व सोपी अशी सुरुवात हवी असते. या कॅम्पेनच्या माध्यमातून ही वाढती उत्सुकता शमविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि पाककृती सुलभ ठेवत केवळ काही सॉसेसच्या मदतीने लोकांच्या पसंतीची चव अन्नपदार्थांमध्ये कशा प्रकारे समाविष्ट करता येऊ शकते हे या सीरिजमधून दिसून येते. ही सिरीज आजच्या तरुणांची खाण्याबाबतची बदलती मानसिकताही दाखवते. त्यांना नवीन देशांची खाद्यसंस्कृती अनुभवायची असते, पण त्याच वेळी व्यस्त दिनचर्येत बसणाऱ्या, कमी वेळात होणाऱ्या आणि समाधान देणाऱ्या पाककृती हव्या असतात.
‘MOM-FU: माँ का प्यार इन कोरियन अवतार’ या कल्पनेवर आधारलेल्या या कॅम्पेनमध्ये पाच पाककृतींच्या व्हिडियोंचा समावेश आहे. कोरियन स्पायसी पनीर, कोरियन स्पायसी नूडल्स, कोरियन बिबिम्बॅप, कोरियन फ्राइड राईस आणि कोरियन व्हेज डकगाल्बी अशा पाककृतींद्वारे कोरियन स्वाद भारतीय स्वयंपाकघरात सहज तयार करता आल्या पाहिजेत, हे या सीरिजचे उद्दिष्ट आहे. या सिरीजमध्ये सोयाबीन सॉस, गार्लिक चिली सॉस आणि रेड चिली सॉस वापरून कोरियन स्पायसी पनीर तयार करण्यात आले आहे. देसी शेजवान सॉस, ग्रीन चिली सॉस, सोयाबीन सॉस आणि चिली व्हिनेगरच्या वापरातून कोरियन स्पायसी नूडल्स दाखवले आहेत, तर चिली व्हिनेगर आणि सोया बीन सॉस वापरून कोरियन बिबिम्बॅप ही पाककृती सादर करण्यात आली आहे. कोरियन फ्राइड राइस आणि कोरियन व्हेज डकगाल्बी या रेसिपीजही मदर्स रेसिपीच्या सॉसेसच्या मदतीने तयार करण्यात आल्या आहेत. कोरियन शैलीतील हे लोकप्रिय पदार्थ, सहज उपलब्ध असलेले जिन्नसांपासून तयार करण्यात आले आहेत. यापैकी प्रत्येक पाककृती समजायला अत्यंत सोपी आहे. हे पदार्थ करण्याच्या पायऱ्याही सुलभ आहेत. त्यामुळे या पाककृती करणारा प्रेक्षक पहिल्यांदाच कोरियन पदार्थ करत असला तरी त्यांना हे पदार्थ करणे अत्यंत सोपे जाईल.
या कॅम्पेनबद्दल मदर्स रेसिपीच्या कार्यकारी संचालक संजना देसाई म्हणाल्या, “घरी पाकसिद्धी करणे म्हणजे अत्यंत काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करणे. यात होणारा बदल म्हणजे लोकांना आपल्या स्वयंपाकघरात आता वेगळ्या चवी हव्या आहेत. आम्हाला दिसत आहे की, अधिकाधिक ग्राहक, विशेषतः तरुणांना परदेशातील पदार्थ घरी करणे आवडत आहे आणि कोरियन पदार्थ हे त्याचे एक महत्त्वाचे उदाहरण आहे. या पाककृती सोप्या पद्धतीने करता येऊ शकता, हे त्यांना सांगणे हा या सीरिजमागचा आमचा हेतू आहे. आमच्या चायनीज सॉसेसचा वापर करून स्वयंपाक करण्याच्या आनंदासोबतच चवही पटकन साध्य करता येऊ शकते.”
शॉर्ट फॉर्म कंटेन्ट आणि सोशल फर्स्ट स्टोरीटेलिंगच्या माध्यमातून सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून या पाककृती व्हिडियोंचा प्रसार करण्यात येईल. उच्च दर्जाचे व्हिज्युअल कंटेंट, जसे की रेसिपी व्हिडिओज आणि प्रॉडक्ट पॅक शॉट्स, यांचाही या कॅम्पेनमध्ये वापर करण्यात येणार आहे. यामुळे अन्न, लाइफस्टाईल आणि संस्कृतीवर भर देणाऱ्या डिजिटल माध्यमांमध्ये व्हिडिओवर आधारित कव्हरेज, रेसिपी फीचर्स आणि सोशल मीडिया एम्बेड्स सहजपणे करता येणार आहेत. या कॅम्पेनसाठी पीआर आउटरीचमध्ये डिजिटल स्टोरीटेलिंगवर भर दिला जाणार असून, घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवता येणाऱ्या रेसिपी, कोरियन चवींची इच्छा पूर्ण करण्याचे मार्ग आणि रोजचा स्वयंपाक अधिक मजेदार बनवण्यात सॉसेसची भूमिका यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येईल.
या डिजिटल फर्स्ट कॅम्पेनच्या माध्यमातून मदर्स रेसिपी आपल्यावरील विश्वास कायम ठेवत आधुनिक भारताच्या खाद्यपसंतीला साजेशा वेगाने पुढे जात आहे. या सीरिजच्या माध्यमातून, ग्राहकांना काहीतरी नवीन पदार्थ करून पाहण्यास, स्वयंपाकाचा आनंद घेण्यास आणि ताज्या, चविष्ट व घरी तयार केलेल्या पदार्थांच्या निमित्ताने एकत्रितपणे भोजनाचा आस्वाद घेण्यास आवाहन करत आहे.


