जास्त’ व्हेरिएंट्स, अधिक पर्याय आणि अतुलनीय मूल्याद्वारे पूर्ण श्रेणीमध्ये वैशिष्ट्ये पुढे सगळ्यांसाठी उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे.
Kylaq चार पासून सहा व्हेरिएंटपर्यंत उपलब्ध आहे, जी 11 वेगवेगळ्या किमतींमध्ये उपलब्ध आहे.
सादर करत आहे नवीन Classic+ व्हेरिएंट, ज्यामुळे Kylaq ही तिच्या सेगमेंटमधील पूर्ण-विकसित टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक असलेली सर्वात सहज उपलब्ध होणारी कार बनली आहे.
इलेक्ट्रिक सनरूफ, क्रूझ कंट्रोल, ऑटो IRVM, रेन-सेन्सिंग वायपर्स, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग, LED लाइट्स आणि बरेच काही यांसारख्या वैशिष्टे स्टँडर्ड म्हणून सुसज्ज आहे.
Signature आणि Signature+ व्हेरियंट्समध्ये आता इलेक्ट्रिक सनरूफ आणि इतर अनेक अपग्रेड्स मिळतील.
Prestige+, हा एक पूर्णपणे नवीन व्हेरिएंट, Kylaq लाइनमध्ये सर्वात वरच्या स्थानावर ठेवण्यात आला आहे.
मर्यादित कालावधीसाठी Kylaq च्या खरेदीवर, निवडक व्हेरिएंट्सवर विशेष वर्धापनदिन ऑफर, सर्व्हिस पॅकेजेस आणि निश्चित भेटवस्तू सादर करत आहोत.
मुंबई, 03 फेब्रुवारी 2026: 2025 मध्ये विक्रीचे सर्वात यशस्वी वर्ष नोंदवल्यानंतर आणि नवीन Kushaq सादर केल्यानंतर, Škoda Auto India त्यांच्या वाढत्या उत्पादन श्रेणीसह त्यांची प्रगती कायम ठेवत आहे. ब्रँडने त्यांची सर्वाधिक विकली जाणारी कार, Kylaq च्या व्हेरिएंट्सची श्रेणी विस्तारून आणि ग्राहकांना जास्त व्हेरिएंट्स, भरपूर पर्याय व अधिक मूल्य प्रदान करून, भारतीय रस्त्यांवर युरोपियन तंत्रज्ञान सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याच्या आपल्या धोरणाला पुढे नेले आहे.
Kylaq हे भारतात Škoda Auto च्या वाढीच्या प्रवासाचा एक मजबूत आधारस्तंभ म्हणून उदयास आले आहे. लाँच झाल्यापासून 50,000 हून अधिक गाड्यांची विक्री झालेल्या Kylaq ने, देशातील या ब्रँडच्या 25 व्या वर्षात Škoda Auto India च्या आतापर्यंतच्या सगळ्यात चांगल्या विक्री कामगिरीमध्ये मोठे योगदान दिले आहे. Kylaq ची सुरक्षा, ड्रायव्हिंग डायनॅमिक्स, तंत्रज्ञान आणि किमतीचे योग्य संयोजन ग्राहकांना खूप आवडले असून, sub-4m SUV सेगमेंटमध्ये ती एक प्रमुख स्पर्धक म्हणून उभी आहे.
Kylaq च्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त भाष्य करताना, Škoda Auto India चे ब्रँड डायरेक्टर आशीष गुप्ता, म्हणाले, “Kylaq म्हणजे भारताप्रती असलेल्या आमच्या दीर्घकालीन वचनबद्धतेचा एक भक्कम पुरावा आहे आणि यामुळे आम्ही बाजारातील सर्वात स्पर्धात्मक सेगमेंटमध्ये प्रवेश केला. 50,000 विक्रीचा टप्पा पार करणे ही खरोखरच एक आनंद देणारी बाब असून Škoda ब्रँडवरील वाढत्या विश्वासाचे प्रतीक आहे. ही गती कायम ठेवण्यासाठी, आम्ही ग्राहकांच्या सूचनांनुसार सुधारणा करून Kylaq लाइन-अपचा विस्तार करून, Kylaq ला त्याच्या सेगमेंटमधील रिअल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली सर्वात सहज उपलब्ध होणारी गाडी बनवत आहोत. हे अपग्रेड्स आजच्या ग्राहकांसाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या वैशिष्ट्यांना, सर्व व्हेरिएंट्समध्ये, सर्वांसाठी उपलब्ध करून देतात. अधिक व्यापक आणि सुव्यवस्थित श्रेणी, आणि या वर्षाच्या उत्तरार्धात नियोजित असलेल्या अधिक रोमांचक नवीन गोष्टींसह, Kylaq भारतीय रस्त्यांसाठी युरोपियन तंत्रज्ञान, उच्च मूल्य आणि उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभव देण्याच्या आमच्या वचनबद्धतेला सातत्याने प्रतिबिंबीत करत आहे.”
व्हेरियंटचे प्रकार
चार व्हेरिएंट्स आणि सात किंमत पर्याय श्रेणी असलेली Kylaq आता 2026 मध्ये सहा व्हेरिएंट्स आणि 11 किंमत पर्यायांपर्यंत विस्तारली आहे. या ब्रँडने Classic+ हे मॉडेल सादर केले आहे, जे एंट्री-लेव्हल Classic आणि Signature ट्रिम्सच्या मध्ये आहे. Kylaq मध्ये आता Prestige+ हा नवीन व्हेरिएंट देखील आहे, जो आता Kylaq लाइनअपमध्ये सर्वात वरच्या स्थानी आहे. या विस्तारामुळे आणि नवीन उत्पादनांच्या समावेशामुळे, Škoda Auto India ने ग्राहकांसाठी विविध किमतींच्या श्रेणी असलेले जास्त पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
सुरुवातीपासूनच सगळ्यांसाठी उपलब्ध करणे
या अपडेटमुळे, Kylaq च्या माध्यमातून Škoda Auto India ग्राहकांसाठी युरोपियन तंत्रज्ञानाची उपलब्धता वाढवण्याच्या त्यांच्या धोरणाला पुढे नेत आहे. बेस Classic व्हेरिएंटच्या वर आता Kylaq Classic+ हे मॉडेल उपलब्ध आहे. या व्हेरिएंटमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, इलेक्ट्रिक IRVM, क्रूझ कंट्रोल, रेन-सेन्सिंग वायपर्स, LED हेडलाइट्स आणि टेललाइट्स, LED डे-टाइम रनिंग लाइट्स आणि मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, Kylaq Classic+ ही पूर्ण विकसित ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टरसह त्याच्या सेगमेंटमधील सर्वात सहज उपलब्ध होणारी कार बनली असून, ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या बाबतीत एक नवीन मापदंड स्थापित करते.
पुढील प्रकार सगळ्यांसाठी उपलब्ध करणे
लोकप्रिय मागणीमुळे Signature आणि Signature+ सारख्या ट्रिम्समध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, ऑटोमॅटिकसाठी पॅडल-शिफ्टर्स, रेन-सेन्सिंग वायपर्स, मागील वायपर आणि वॉशर आणि LED रीडिंग लॅम्प्स यांसारख्या वैशिष्ट्यांची भर घालण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, Škoda Auto India ने टॉप-ऑफ-द-लाइन Prestige ला Prestige आणि Prestige+ असे दोन भागांमध्ये वर्गीकरण केले आहे. यामुळे, पूर्ण सुसज्ज व्हेरियंट्समधून निवड करताना खरेदीदारांना जास्त पर्याय आणि चांगले मूल्य मिळते.
जास्तीत जास्त सुरक्षा. जास्तीत जास्त मनःशांती
भारत NCAP क्रॅश चाचण्यांमध्ये सगळ्यात जास्त सुरक्षा रेटिंग मिळवून, Škoda Kylaq त्याच्या सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित ICE कार म्हणून कायम आहे. याव्यतिरिक्त, प्रत्येक व्हेरिएंटमध्ये सहा एअरबॅग्ज आणि 25 पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्ये स्टँडर्ड म्हणून दिली जातात. उच्च व्हेरियंट्समध्ये 40 पेक्षा जास्त मानक सुरक्षा वैशिष्ट्ये असतात. Kylaq श्रेणीतील सर्वोत्तम 4 वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी देखील देते. तसेच, यामध्ये 4 वर्षांचा स्टँडर्ड रोडसाइड असिस्टन्स आणि 4 मोफत लेबर सर्व्हिसेसचा समावेश आहे. यामध्ये 15,000 किमी आणि 30,000 किमी झाल्यावर नियमित देखभाल सर्व्हिसेसचा, तसेच नव्याने सुरू केलेल्या 1,000 किमी आणि 7,500 किमी च्या Škoda चेक-इन सर्व्हिसेसचा समावेश आहे. या सुविधा आणि पॅकेजेस पारदर्शकता वाढवण्यावर आणि मालकांचा अनुभव अधिक चांगला करण्यावर लक्ष केंद्रित करतात.
Kylaq चे यशस्वी एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे उत्सव साजरा करत आहोत
ब्रँडने Kylaq च्या निवडक व्हेरियंट्सवर मर्यादित कालावधीसाठी वर्धापनदिनानिमित्त विशेष ऑफर्स जाहीर केल्या आहेत, ज्यामध्ये ग्राहकांना ₹50,000 पर्यंत फायदा मिळू शकतो. याव्यतिरिक्त, Kylaq च्या एक वर्षाच्या Škoda Maintenance Package वर 50% सूट मिळत आहे. याव्यतिरिक्त, कोणत्याही व्हेरिएंटमधील Kylaq खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकासाठी एक निश्चित भेटवस्तू आहे. या ऑफर 28 फेब्रुवारी 2026
पर्यंत उपलब्ध असतील.
*****


