Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedएचपीकडून भारतातील घरगुती वापरासाठी नवीन डेस्कजेट प्रिंटर्स बाजारात

एचपीकडून भारतातील घरगुती वापरासाठी नवीन डेस्कजेट प्रिंटर्स बाजारात

बातमीची वैशिष्टे

 

घरून शिक्षण, निर्मिती आणि काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि व्यावसायिकांसाठी उपयुक्त

कमी किमतीच्या शाई आणि विश्वासार्ह ड्युअल-बँड वाय-फायसोबत प्लग-अँड-प्ले प्रिंटिंग, स्कॅनिंग आणि कॉपी करणे सोपे

सर्व मॉडेल्समध्ये किमान ७०% पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकचा समावेश

व्हेरी पेरी, वॉर्म अरोमा, सर्फ ब्लू, माचू पिचू आणि पिमेंटोसह पांढऱ्या बेस आणि वैविध्यपूर्ण रंगांसह सहा मॉडेल्समध्ये उपलब्ध

निवडक प्रिंटरसह १ वर्षाचे एचपी प्रिंट लर्न सेंटर सबस्क्रिप्शन मोफत (किंमत ₹८९९)

 

 

 

एचपीने भारतात डेस्कजेट ऑल-इन-वन (एआयओ) प्रिंटरची एक नवीन श्रेणी सादर केली आहे. ती विद्यार्थी, पालक आणि व्यावसायिकांसाठी होम प्रिंटिंग अधिक स्मार्ट, सोपी आणि अधिक सहज बनवण्यासाठी डिझाइन केलेली आहे. या उत्पादन श्रेणीत एचपी डेस्कजेट, एचपी डेस्कजेट इंक अॅडव्हान्टेज आणि एचपी डेस्कजेट अल्ट्रा इंक अॅडव्हान्टेजमधील चार मॉडेल्स समाविष्ट आहेत. ते दैनंदिन घरगुती कामांत सुलभता, कार्यक्षमता आणि किफायतशीर दरांचे संतुलन आणतात.

 

 

 

दैनंदिन छपाईच्या गरजांसाठी उपयुक्त नवीन डेस्कजेट ऑल-इन-वन (एआयओ) मालिका घरगुती छपाईला सहज आणि विश्वासार्ह बनवते. या श्रेणीत साधे प्रिंटिंग आणि स्कॅनिंगपासून ते उच्च-व्हॉल्यूम प्रिंटिंगपर्यंत, स्वयंचलित दस्तऐवज फीडिंगसारख्या अतिरिक्त सोयीस्कर वैशिष्ट्यांसह वेगवेगळ्या घरगुती छपाईच्या गरजांसाठी डिझाइन केलेले मॉडेल्स समाविष्ट आहेत. ते व्यत्यय टाळण्यासाठी स्वयं दुरूस्ती तंत्रज्ञानासह विश्वसनीय ड्युअल-बँड वाय-फाय® सह येते आणि घरात कुठूनही सोपे प्रिंट, स्कॅन आणि कॉपी कार्यक्षमतादेखील देते. कमी किमतीच्या, उच्च-उत्पादन देणाऱ्या मूळ एचपी आयएनसीसह ही मालिका असाइनमेंट, प्रकल्प आणि दैनंदिन कामाच्या कागदपत्रांसाठी उत्तम रंगांमध्ये मजकुराची छपाई करते.

 

 

 

“भारतीय घरे बदलत होत असताना ती पुढील पिढीची प्रिंटिंग सोल्यूशन्स शोधत आहेत जी आटोपशीर, वाय-फाय सक्षम आणि वापरण्यास सोपी असतील. तसेच त्यांच्या रोजच्या आयुष्यात उपयुक्त ठरतील,” असे एचपी आयएनसीचे इंडिया मार्केट – प्रिंट कॅटेगरीचे वरिष्ठ संचालक सतीश कुमार म्हणाले. ” या गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन एचपी डेस्कजेट मालिकेची रचना करण्यात आली आहे. त्यात स्मार्ट प्रिंटिंग तंत्रज्ञानाला समकालीन डिझाइन आणि वैविध्यपूर्ण रंग अॅक्सेंटसह जोडण्यात आले आहे. इन्टुटिव्ह सेटअप आणि अखंड कनेक्टिव्हिटीसह ही नवीन श्रेणी कुटुंबांना दररोज आत्मविश्वासाने प्रिंट करण्यास, शिकण्यास आणि निर्मिती करण्यास मदत करेल. त्यामुळे देशभरातील कुटुंबांसाठी प्रिंटिंग, स्कॅनिंग आणि कॉपी करणे सोपे, कार्यक्षम आणि आकर्षक बनेल.”

 

 

 

उत्पादकता आणि कामगिरी

 

· घरातून कुठूनही प्रिंटिंग, स्कॅनिंग आणि कॉपी करण्याच्या गरजा पूर्ण होतील

 

· एचपी डेस्कजेट २९३१, एचपी डेस्कजेट आयए २९८६/२९८९, एचपी डेस्कजेट यूआयए ५१३५/५१८५ साठी प्रति मिनिट ७.५ पाने (पीपीएम) (काळा) / ५.५ पीपीएम (रंगीत) आणि डेस्कजेट ४३८८ साठी ८.५ पीपीएम काळा

 

· सर्व मॉडेल्समध्ये ६० – पानांचा इनपुट ट्रे आहे

 

· एचपी डेस्कजेट इंक एडव्हान्टेजट ४३८८ मध्ये मॅन्युअल पेज हाताळणे शक्य करणारे ऑटोमॅटिक डॉक्युमेंट फीडरही आहे

 

 

 

वापरणाऱ्यांसाठी चांगला अनुभव आणि विश्वासार्हता

 

· ड्युअल-बँड (२.४ गिगाहर्ट्झ आणि ५ गिगाहर्ट्झ) सेल्फ-हीलिंग वाय-फाय पुन्हा आपोआप कनेक्ट होते. त्यामुळे अखंड प्रिंटिंग शक्य होते

 

· एचपी अॅपद्वारे ब्लूटूथ आणि वाय-फायद्वारे मल्टी-डिव्हाइस प्रिंटिंग कार्यक्षमता

 

· सोप्या ऑपरेशनसाठी इन्टुएटिव्ह बटणांसह वापरकर्तास्नेही नियंत्रण पॅनेल

 

· समकालीन पांढरा बेस आणि ट्रेंडिंग अॅक्सेंट रंगांसह जागा-कार्यक्षम फूटप्रिंट जे कोणत्याही घराच्या वातावरणात मिसळतात.

 

 

 

शाश्वत डिझाइन

 

· सर्व मॉडेल्समध्ये किमान ७०% वापरल्यानंतर प्रक्रिया केलेल्या प्लास्टिकचा पुनर्वापर

 

· एचपी प्लॅनेट पार्टनर्स प्रोग्रामद्वारे रीसायकल शक्य[i]

 

 

 

किंमत आणि उपलब्धता

 

· एचपी डेस्कजेट इंक अॅडव्हान्टेज २९८६ ऑल-इन-वन प्रिंटरची किंमत एचपी ईस्टोअरवर ६९९९ रुपये आहे, पांढऱ्या व्हेरी पेरी रंगात उपलब्ध. Click here.

 

· एचपी डेस्कजेट इंक अॅडव्हान्टेज २९८९ ऑल-इन-वन प्रिंटरची किंमत एचपी ईस्टोअरवर ६९९९ रुपये आहे, पांढऱ्या माचू पिचू रंगात उपलब्ध. Click here.

 

· एचपी डेस्कजेट इंक अॅडव्हान्टेज ४३८८ ऑल-इन-वन प्रिंटरची किंमत एचपी ईस्टोअरवर ७९९९ रुपये आहे, पांढऱ्या सर्फ ब्लू रंगात उपलब्ध आहे. Click here.

 

· एचपी डेस्कजेट अल्ट्रा इंक अॅडव्हान्टेज ५१३५ पांढऱ्या वॉर्म अरोमामध्ये आणि ५१८५ व्हाइट पिमेंटो ऑल-इन-वन प्रिंटर लवकरच उपलब्ध होतील.

 

· एचपी डेस्कजेट २९३१ ऑल-इन-वन प्रिंटर व्हेरी पेरी रंगात लवकरच उपलब्ध होईल.

 

 

 

 

 

ग्राहकांना एचपी पीएलसी वेबसाइटवर किंवा एचपी अॅपच्या माध्यमातून शैक्षणिक वर्कशीट्सचे व्यापक कलेक्शन पाहता येईल.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments