Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहाशिवरात्री निमित्त श्री विश्वनाथ महाकाळेश्वर मंदिरात शिव तत्वाच्या अनुभूतीचा जागर

महाशिवरात्री निमित्त श्री विश्वनाथ महाकाळेश्वर मंदिरात शिव तत्वाच्या अनुभूतीचा जागर

पुणे, दि. १६ फेब्रुवारी: सृष्टिच्या आदिम तत्वांचे, ध्यान योगाच्या अखंड परंपरेचे आणि संहरातून नव सृजन घडविणार्‍या चेतनेचे प्रतीक आदियोग शिव यांच्या स्मरणाने महाशिवरात्रीचा पावन सोहळा श्री विश्वनाथ महाकाळेश्वर मंदिर या ठिकाणी अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

माईर एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे, एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भा.स.त.ग्रा. रुग्णालय तळेगाव येथे उभारण्यात आलेल्या श्री विश्वनाथ महाकाळेश्वर मंदिर येथे मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरा करण्यात आला. फाल्गुन कृष्ण चतुर्दशीची ही रात्र अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि अस्थिरतेतून शांततेकडे नेणारी आध्यात्मिक साधनेची रात्र मानली जाते.

या मंदिरात रुद्राभिषेक, जल व दुग्धाभिषेक, बेलपत्र व पुष्ण अर्पण करून शिवपूजन करण्यात आले. यज्ञ, हवन, सामूहिक महाआरती तसेच भजन, कीर्तन कार्यक्रमांनी मंदिर परिसर शिवमय झाला होता. शिवमहिमा स्त्रोत, शिवतांडव स्त्रोत आणि शिवलिलामृत पठणाने भक्तीचा स्वर दाटला. शिवमय वातावरण, हर हर महादेव चा जय घोष आणि श्रद्धाभावाने नतमस्तक झालेले भाविक यामुळे संपूर्ण परिसर महाशिवरात्रीचा सोहळा आध्यात्मिक उर्जेचा आणि सामूहिक भक्तीभावाचा अनुपम संगम ठरला.

या प्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ महाशिवरात्री ही केवळ बाह्य उपसनेची नव्हे, तर आत्मशुद्धी जागृतीची संधी आहे. जसे शिवलिंगावर अभिषेक करून पावित्र्याचा अनुभव घेतला जातो, तसेच अंतर्मनातील अज्ञान, अहंकार आणि नकारात्मकता दूर करून आत्मप्रकाशाकडे वाटचाल करावी. शैव तत्वज्ञानातुन हे केवळ देवतेचे नसून योग, ध्यान संयम आणि आत्मजागृतीचे मूर्त तत्व आहे. शिव म्हणजे शून्य आणि पूर्णत्व यांचा संगम. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय या त्रिकालात्मक प्रक्रियेचे केंद्र आहे. महाशिवरात्री ही रात्र त्याग, संतुलन आणि विश्वकल्याणाच्या भावनेची प्रतीक मानली जाते.”

या मंदिरात उत्साहाची सुरूवात काकडा आरतीने, रुद्राभिषेक, श्री शालिकराम महाराज खंदारे यांचे हरी कीर्तन, शिवलीलामृत पारायण, हरिपाठ आणि नंतर संत तुकाराम महाराज यांचे वंशज हभप श्री बापूसाहेब मोरे यांच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली.

या प्रसंगी माईर्स एमआयटी शिक्षण वैद्यकीय महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. सुचित्रा नागरे, विश्वस्त सौ.स्वाती चाटे, सौ. उषा विश्वनाथ कराड व माईरचे कुलसचिव डॉ. रत्नदीप जोशी, श्री. गिरीष दाते व श्री. योगेश पारखी उपस्थित होते. तळेगावातील ग्रामस्थ, वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटलमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी शंकराच्या पिंडीचे दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतला

.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments