Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रीय टी20 क्रिकेट फॉर द व्हिज्युअली इम्पेअर्ड स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, पश्चिम...

राष्ट्रीय टी20 क्रिकेट फॉर द व्हिज्युअली इम्पेअर्ड स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, पश्चिम बंगाल संघांची विजयी सलामी

पुणे,16 फेब्रुवारी 2026 : द पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशन (पीबीएमए) आणि ब्लाईंड क्रिकेट असोसिएशन (बीसीए) तर्फे एचसीएलफाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित राष्ट्रीय टी20 क्रिकेट फॉर द व्हिज्युअली इम्पेअर्ड स्पर्धेत गट साखळी फेरीत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, पश्चिम बंगाल या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून शानदार सुरुवात केली.

 

डेक्कन जिमखाना मैदान व पद्ममावती येथील टेंबेकर मैदान येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत अ गटात सलामीच्या लढतीत अभिजीत शिरोड(नाबाद 105 धावा व 1-12) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने मध्य प्रदेश संघाचा 99 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली.

 

दुसऱ्या सामन्यात अनिल गरिया(नाबाद 200 धावा व 3-16), गणेश भुसारा(नाबाद 147 व 2-15) यांनी केलेल्या सुरेख अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर गुजरात संघाने चंदीगढ संघाचा 356 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

 

अन्य लढतीत सागर एस याने केलेल्या नाबाद 81 धावांच्या खेळीच्या जोरावर कर्नाटक संघाने उत्तरप्रदेश संघाचा 117 धावानी पराभव करत शानदार सुरुवात केली. प्रसनजीत अडक(नाबाद 120धावा) याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर पश्चिम बंगाल संघाने राजस्थान संघावर 233 धावांनी विजय मिळवला.

 

निकाल: गट साखळी फेरी:

अ गट : डेक्कन जिमखाना मैदान :

महाराष्ट्र: 20 षटकात बिनबाद 212धावा(अभिजीत शिरोड नाबाद 105(63,10×4), कृष्णा सोनवणे नाबाद 92(57,10×4)) वि.वि. मध्य प्रदेश: 14.4 षटकात सर्वबाद 113 धावा(मुकेश राठोड 21, मनीष बी 17, कृष्णा सोनवणे 2-6, गणराज जाधव 2-30, आशिष पोखडे 2-4, अभिजीत शिरोड 1-12); सामनावीर – अभिजीत शिरोड; महाराष्ट्र संघ 99 धावांनी विजयी;

 

कर्नाटक: 20 षटकात 6बाद 197धावा(सागर एस नाबाद 81(61, 8×4), मनोज एम 26, बसवराज हुदेड नाबाद 16, आदित्य राज 2-30) वि.वि.उत्तरप्रदेश: 9.4 षटकात सर्वबाद 80धावा(ओमप्रकाश कुमार 10, पंकज कुमार 8, परशू 3-17, रामचंद्र मयप्पा 3-22, योगेश जे 2-12) सामनावीर – सागर एस; कर्नाटक संघ 117 धावांनी विजयी;

 

ब गट : टेंभेकर मैदान, पद्मावती

पश्चिम बंगाल: 15 षटकात 5 बाद 304धावा(प्रसनजीत अडक नाबाद 120(46, 24×4), प्रसनजीत मैती 46(18, 10×4), चंदन मैती नाबाद 12, अमित कुमार टेलर 2-60, महिंदर सिंग 1-32) वि.वि.राजस्थान: 10.3षटकात सर्वबाद 71धावा(महिंदर सिंग 20, अमित कुमार टेलर 10, अक्षय गोरे 2-8, रहमत अली 1-8); सामनावीर – प्रसनजीत अडक; पश्चिम बंगाल संघ 233 धावांनी विजयी;

 

गुजरात: 20 षटकात बिनबाद 388धावा(अनिल गरिया नाबाद 200(71,40×4, 1×6), गणेश भुसारा नाबाद 147(58,30×4)) वि.वि.चंदीगढ: 7.3 षटकात सर्वबाद 32धावा(सनी कुमार 18, अनिल गरिया 3-16, गणेश भुसारा 2-15, हितेश पटेल 2-1); सामनावीर – अनिल गरिया; गुजरात संघ 356

धावांनी विजयी.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments