Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहापालिकेच्या वतीने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त...

महापालिकेच्या वतीने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन….

पिंपरी, दि. १७ फेब्रुवारी २०२६ : “जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी” अशी क्रांतिकारी घोषणा करणारे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि त्यांना साथ देणारे क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे देशासाठी दिलेले योगदान देशभक्तीची सतत प्रेरणा देत राहील असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चिंचवड स्टेशन येथील पुतळ्यास तसेच महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस महापालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,त्यावेळी ते बोलत होते.

 

या कार्यक्रमास उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसदस्या अनुराधा गोरखे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संदीपान झोंबाडे, नितीन घोलप,संजय धुतडमल, राजू आवळे, भाऊ कसबे, बाळासाहेब रसाळ, शिवाजी खडसे, रवींद्र वाघमारे, नाना कांबळे, नामदेव रिटे,मारुती सोनटक्के, बाळासाहेब खंदारे, अनिकेत साळवे, जितेंद्र मोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले की, स्वतः युध्दनितीनिपुण असलेल्या आणि देशभक्तीने प्रेरित झालेल्या क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांनी हजारो क्रांतिकारकांची फौज तयार केली आणि इंग्रजाविरूध्द मोठा लढा दिला तर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी परकीय सत्तेविरुद्ध ठाम भूमिका घेत स्वातंत्र्याच्या विचारांना नवे बळ दिले आणि देशनिष्ठेचा आदर्श निर्माण केला,या दोन्ही महापुरुषांचे योगदान देशातील स्वातंत्र्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखे असून त्यांच्या देशभक्तीचा,महान कार्य कर्तृत्वाचा वारसा जोपासणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे महापौर लांडगे यांनी सांगितले

.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments