Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorized*गुरु तेग बहादुर सिंह यांच्या ३५० व्या शहीद महोत्सवानिमित्त पुण्यात चित्ररथाचे स्वागत*

*गुरु तेग बहादुर सिंह यांच्या ३५० व्या शहीद महोत्सवानिमित्त पुण्यात चित्ररथाचे स्वागत*

 

 

पुणे, दि. १७ फेब्रुवारी २०२६ (जिमाका वृत्तसेवा) : गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीद महोत्सवानिमित्त त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित चित्ररथाचे आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. हा चित्ररथ नुकताच पाषाण येथे दाखल झाला असून विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

 

सकाळी ११.३० वाजता पाषाण येथील भैरवनाथ मंदिर वस्ती येथे चित्ररथासमोर कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर सुस रोडवरील साई चौक येथे रथ थांबवून नागरिकांना दर्शनाची संधी देण्यात आली.

लमाणतांडा पाषाण बाधित वस्ती येथे सुमारे तीन तास चित्ररथ थांबविण्यात आला. या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. तसेच परिसरातील चौकांमध्ये रथ लावून ‘हिंद दी चादर ‘ कार्यक्रमाच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात आली.

 

यानंतर औंध येथील जिजामाता चौक (परिहार चौक), औंध गुरुद्वारा, नीलकंठेश्वर मंदिर तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे रथ लावून कार्यक्रम पार पडले. खडकी येथे मुख्य बाजारपेठ, शिवाजी महाराज स्मारक व खडकी गुरुद्वारा येथेही चित्ररथासमोर विविध धार्मिक व प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

 

या प्रसंगी श्री. गणेशजी कलापुरे, श्री. विशालजी मेघावत, श्री. संदीपजी तुपे, औंध गुरुद्वाराचे विश्वस्त श्री. पंपीनदर सिंग मान, औंध गुरुद्वाराचे पुजारी बाबाजी सिंग, खडकी गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा येथील मनमोहन सिंग (ग्यानीजी), बोपोडी संयोजक श्री. अक्षयजी मुरडे, श्री. अक्षय भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments