मुंबई, १८ फेब्रुवारी 2026 : कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (“कोटक लाइफ”) तर्फे कोटक सिग्नेचर लेगेसी या वयाच्या 99 वर्षांपर्यंत वाढता विमा संरक्षण प्रदान करणारा लाइफ टर्म प्लॅन सादर करण्यात आला आहे. यामुळे लोकांना त्यांच्या कुटुंबाची दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा मजबूत करण्यास मदत होईल.
40 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या बाबतीत प्रगतीसोबत त्यांची सुरक्षा पुरेशी वाढलेली नाही या वास्तवाला कोटक सिग्नेचर लेगेसी हा प्रतिसाद देते.
करिअर पुढे जात असताना आणि जबाबदाऱ्या वाढत असताना, गृहकर्ज, EMIs, दीर्घकालीन कौटुंबिक उद्दिष्टे आणि अपेक्षा यांसारख्या आर्थिक वचनबद्धता सातत्याने वाढत राहतात. तरीही या टप्प्यावर अनेकांना असे वाटते की त्यांचे विमा संरक्षण पुरेसे नाही, कारण विद्यमान विमा संरक्षण अपुरे आहे किंवा दीर्घकाळामध्ये त्याचा पुनर्विचार केलेला नाही.
कोटक सिग्नेचर लेगेसी प्लॅन ही उणीव भरून काढतो. तो बदलती जीवनशैली आणि वाढणाऱ्या जबाबदाऱ्यांसोबत दीर्घकालीन सुरक्षा प्रदान करतो, आर्थिक सुरक्षिततेला बळकटी देतो.
कोटक लाइफचे व्यवस्थापकीय संचालक श्री. महेश बालासुब्रमण्यम म्हणाले, “ ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करणारी नाविन्यपूर्ण उत्पादने तयार करून वितरित करणे ही आमची कोटक लाईफमध्ये वचनबध्दता आहे.कोटक सिग्नेचर लेगसी व्यक्तींना त्यांच्या वाढत्या संरक्षण गरजा बळकट करण्यास सक्षम करते आणि त्यांच्या जीवनप्रवासासोबत पुढे जाणारी योजना तयार करते.आमचा विश्वास आहे की हे उत्पादन कुटुंबांना आत्मविश्वास,मन:शांतीसह आर्थिक सुरक्षितता मिळविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
या उत्पादनामध्ये दोन पर्याय आहेत.
· लेगेसी प्लॅन – वाढत्या संरक्षणासह वयाच्या 99 वर्षापर्यंत संपूर्ण जीवन संरक्षण
· लेगेसी प्लस प्लॅन – वाढत्या संरक्षणासह आणि हप्त्याचा परतावा (रिटर्न ऑफ प्रीमियम) मिळत 99 वर्षांसह संपूर्ण जीवन संरक्षण
या उत्पादनात अनेक अंगभूत फायदे आहेत, ज्यामध्ये गंभीर रोगांसाठी कव्हरेज, प्रीमियम पेमेंट टर्मदरम्यान अॅक्सीडेंटल डेथ बेनिफिट आणि प्रीमियम पेमेंट टर्मनंतर अॅक्सीलरेटेड क्रिटीकल इलनेस बेनिफिट यांचा समावेश आहे. ग्राहकांना आरोग्य आणि वेलनेस फायदे देखील मिळतात, ज्यामध्ये दर तीन वर्षांनी कॉम्प्लिमेंट्री मेडिकल चेक-अप* समाविष्ट
आहे.


