विमान-प्रेरित डिझाइन : सेगमेंटमधील पहिल्यांदाच पूर्ण मोनोकॉक बांधणीवर तयार केलेले उडो आकर्षक, एरोडायनॅमिक डिझाइनसह सादर – दमदार हेडलॅम्प्स, स्टायलिश मिरर्स आणि मोठे विंडशील्ड यामुळे रस्त्यावर वेगळी ओळख
• अतुलनीय आरामदायी : सेगमेंटमधील सर्वाधिक आरामदायी ड्रायव्हर सीट – ‘पायलट सीट’, तसेच उत्कृष्ट लेगरूम आणि हेडरूमसह ‘फर्स्ट-क्लास’ प्रवासी आसनव्यवस्था, लाउंजसारखा अनुभव देणारी
• दमदार परफॉर्मन्स : स्मार्ट ड्राइव्ह मोड्स (रेंज, राइड, रेस)सह 200 किमी प्रत्यक्ष ड्रायव्हिंग रेंज – सेगमेंटमधील सर्वाधिक ऊर्जा-कार्यक्षम वाहन
• उद्योगात पहिल्यांदाच वैशिष्ट्ये : रिव्हर्स थ्रॉटल आणि क्रीप मोडमुळे वाहनावर अधिक अचूक नियंत्रण
• उत्कृष्ट सुरक्षितता : शक्तिशाली ड्रम ब्रेक्समुळे सेगमेंटमधील सर्वात कमी ब्रेकिंग अंतर सुनिश्चित
हैदराबाद, 12 फेब्रुवारी 2026 : महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटी लिमिटेड (एमएलएमएमएल) या भारतातील क्रमांक 1*च्या इलेक्ट्रिक कमर्शियल वाहन उत्पादक कंपनीने आज शेवटच्या टप्प्यातील वाहतुकीच्या क्षेत्रात नवे पर्व सुरू करत आपली आतापर्यंतची सर्वात प्रगत इलेक्ट्रिक तीनचाकी महिंद्रा उडो सादर केली. महिंद्रा उडो चे डिझाइन विमानातून प्रेरित असून, कंपनीने या ऑटोला ‘ऑटोप्लेन’ अशी संकल्पना दिली आहे. डिझाइन, परफॉर्मन्स आणि आराम या तिन्ही बाबतीत हा मॉडेल मोठी झेप घेणारा ठरतो. हिंदीमध्ये ‘उडो’ म्हणजे ‘उडणे’. या नावाप्रमाणेच महिंद्रा उडो ग्राहकांच्या स्वप्नांना पंख देत त्यांना आयुष्यात अधिक उंच भरारी घेण्यास मदत करणार आहे. याची आकर्षक किंमत ₹3,84,299.०० (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. मात्र, मर्यादित कालावधीसाठी युडो फक्त ₹3,58,999.०० या विशेष किमतीत उपलब्ध असणार आहे.
आराम आणि डिझाइनला नवी ओळख
1948 पासून जागतिक स्तरावर फारसा बदल न झालेल्या पारंपरिक ऑटो डिझाइनमध्ये चालक आणि प्रवाशांच्या आरामाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले होते. जगातील सर्वात मोठी 3-व्हीलर ईव्ही बाजारपेठ भारतात असताना, देशातील ई-ऑटो क्षेत्रातील अग्रणी कंपनीने बदलाची धुरा हाती घेणे स्वाभाविकच आहे. नव्या ऑटो-रिक्षाच्या क्रांतिकारी डिझाइनमुळे चालकांचा सन्मान वाढवणे, त्यांच्या व्यावसायिक प्रतिमेला नवी उंची देणे आणि मालकीचा अनुभव अधिक अभिमानास्पद बनवणे हे उद्दिष्ट आहे. प्रताप बोस, मुख्य डिझाइन आणि क्रिएटिव्ह अधिकारी – ऑटो आणि फार्म सेक्टर्स, महिंद्रा अँड महिंद्रा लि., तसेच महिंद्रा इंडिया डिझाइन स्टुडिओ येथील त्यांच्या टीमने ऑटोची नव्याने कल्पना साकारली आहे. उडोचे आकर्षक, एरोडायनॅमिक डिझाइन, दमदार हेडलॅम्प्स, स्टायलिश मिरर्स आणि मोठे विंडशील्ड यामुळे रस्त्यावर त्याची उपस्थिती अधिक प्रभावी आणि वेगळी ठरते.
ऑटोप्लेनच्या आतील रचना देखील तितकीच विचारपूर्वक करण्यात आली आहे. चालक आणि प्रवाशांच्या आरामाला केंद्रस्थानी ठेवून एर्गोनॉमिक डिझाइनची आसनव्यवस्था देण्यात आली आहे. चालकासाठी विशेष ‘पायलट सीट’ देण्यात आली असून ती या सेगमेंटमधील इतर वाहनांच्या तुलनेत सुमारे २० टक्के अधिक जाड आणि अधिक आरामदायी आहे. प्रवाशांसाठी ‘फर्स्ट-क्लास’ आसनव्यवस्था देण्यात आली आहे. अधिक लेगरूम आणि हेडरूममुळे
लांब प्रवासातही लाउंजसारखा आरामदायी अनुभव मिळतो. खडबडीत रस्त्यांवरही अधिक स्थिरता आणि स्मूथ राइड मिळावी यासाठी स्वतंत्र रिअर सस्पेन्शन आणि ड्युअल-फोर्क फ्रंट सस्पेन्शनची सुविधा देण्यात आली आहे.
सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच मोनोकॉक बांधणीचा वापर करत तयार केलेल्या महिंद्रा उडोमध्ये अधिक मजबूत स्ट्रक्चरल स्ट्रेंथ आणि सर्वोत्तम दर्जाची राइड क्वालिटी मिळते.
दमदार परफॉर्मन्स
भविष्यवादी डिझाइन आणि अतुलनीय आरामासोबतच महिंद्रा उडोची कामगिरीही तितकीच प्रभावी आहे. हे वाहन प्रत्यक्ष वापरात 200 किमीची सर्वोत्तम-इन-क्लास रेंज देते (एआरएआय प्रमाणित रेंज 265 किमी). आपल्या सेगमेंटमधील सर्वाधिक ऊर्जा-कार्यक्षम वाहन म्हणून उडोची ओळख निर्माण झाली आहे. यामध्ये IP67-रेटेड 11.7 kWh लेझर-वेल्डेड लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे. PMS मोटरमुळे 10 kW पीक पॉवर आणि 52 Nm टॉर्क मिळतो, ज्यामुळे वाहनाला दमदार गती आणि ताकद मिळते. उडोमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंगची सुविधा असून, सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच देण्यात आलेल्या रिव्हर्स थ्रॉटलसोबत मिळून ब्रेक न दाबताही सहज गती नियंत्रण शक्य होते. रिव्हर्स थ्रॉटलमुळे रेंज वाढण्यास मदत होते तसेच अधिक स्मूथ राइड अनुभव मिळतो.
हिल होल्ड असिस्ट आणि क्रीप फंक्शनमुळे चढावावर स्थिरता राखणे आणि बंपर-टू-बंपर ट्रॅफिकमध्ये सहज ड्रायव्हिंग करणे शक्य होते. ‘रेंज’, ‘राइड’ आणि ‘रेस’ या त्रि-मोड ड्रायव्हिंग सिस्टीममुळे चालकांना ट्रॅफिक परिस्थितीनुसार कार्यक्षमतेत आणि परफॉर्मन्समध्ये संतुलन साधता येते. ‘रेस’ मोडमध्ये 55 किमी/तास इतका टॉप स्पीड मिळत असल्याने फेऱ्या जलद पूर्ण करून अधिक उत्पन्न कमावण्याची संधी चालकांना मिळते.
उत्कृष्ट सुरक्षितता
महिंद्रा उडोला 1.5 लाख किमी किंवा 6 वर्षे (जे आधी पूर्ण होईल ते) अशी विश्वासार्ह वॉरंटी देण्यात आली आहे. IP67-रेटेड बॅटरी, ड्राइव्हट्रेन आणि चार्जरमुळे अत्यंत प्रतिकूल हवामानातही वाहनाचा प्रवास सुरक्षितपणे सुरू राहतो.
या वाहनात शक्तिशाली ड्रम ब्रेक्स देण्यात आले असून सेगमेंटमधील सर्वात कमी ब्रेकिंग अंतर सुनिश्चित केले आहे. तसेच 30.48 सेमी ट्यूबलेस टायर्समुळे रस्त्यावर अधिक सुरक्षितता आणि स्थिरता मिळते.
महिंद्राचा उडोवरील आत्मविश्वास उद्योगात पहिल्यांदाच 1 लाख किमीपर्यंत मोफत सर्व्हिसेस देण्याच्या निर्णयातून स्पष्ट होतो. उडो खरेदी करताच ग्राहकांना महिंद्राच्या ‘उदय एनएक्सटी’ योजनेत सामील केले जाते. या योजनेअंतर्गत वाहन मालकाला ₹20 लाखांचे अपघाती विमा संरक्षण, आर्थिक सल्ला सेवा आणि इतर अनेक लाभ दिले जातात.
आकर्षक डिझाइन, सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच देण्यात आलेली वैशिष्ट्ये आणि महिंद्राची विश्वासार्हता यामुळे उडो L5M ऑटो श्रेणीत इलेक्ट्रिफिकेशनला नवी चालना देण्यासाठी सज्ज आहे.
महिंद्रा उडोचे उत्पादन जहिराबाद येथील महिंद्राच्या अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पात केले जाते. या प्रकल्पात कंपनीने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असून, पूर्णपणे स्वयंचलित बॅटरी असेंब्ली आणि रोबोटायझ्ड उत्पादन लाईन्सची उभारणी करण्यात आली आहे.
सुमन मिश्रा, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटी लिमिटेड, म्हणाल्या, “महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटीमध्ये आमचा उद्देश शेवटच्या टप्प्यातील वाहतूक पूर्णपणे इलेक्ट्रिक करून ग्राहकांचे जीवन अर्थपूर्णरीत्या अधिक चांगले बनवणे हा आहे. या लॉन्चद्वारे आम्ही त्या दिशेने ठाम पाऊल टाकत आहोत.
ग्राहकांच्या सखोल गरजांचा अभ्यास करून महिंद्रा उडोची रचना पूर्णपणे नव्याने करण्यात आली आहे. सुरक्षितता, आराम, डिझाइन आणि परफॉर्मन्स यांचा संतुलित संगम साधत हे वाहन साकारले गेले आहे. शेवटच्या टप्प्यातील मोबिलिटी ही केवळ उपजीविकेपुरती मर्यादित न राहता सन्मानाची बनली पाहिजे, असा आमचा विश्वास आहे. त्याचवेळी या श्रेणीत नवे मानदंड प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.


