Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedडोळ्याचे “व्हायरल” आजार ...

डोळ्याचे “व्हायरल” आजार डॉ. सुधीर बबुर्डीकर -वरिष्ठ नेत्रतज्ञ, अग्रवाल आय हॉस्पिटल, औंध, पुणे

डोळे येणे हा सर्वसामान्य आजार सर्वांना माहिती आहे. अशी लक्षणे दिसल्यास घ्यायची काळजी ही आपल्यास अनुभवाने किंवा इतरांकडून कळत असते. सध्या पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात “व्हायरल” डोळे येण्याची साथ चालू आहे. दररोज रुग्ण तपासणी करत असताना अशा प्रकारच्या रुग्णांचे प्रमाण खूप वाढलेले दिसत आहे. आजार त्रासदायक असल्याने बऱ्याच रुग्णांना काम करताना अडचणी येत आहेत. आजारात वेदना होत असल्याने याचे गांभीर्य वाढताना दिसत आहे. वृद्ध व्यक्तींना अधिक अडचणी येत आहेत. आजार संसर्गजन्य असल्यामुळे समाज प्रबोधन करण्याची गरज आहे.

 

कारणे

 

1. विषाणू (व्हायरस)

 

2. मुख्यतः अडीनो नावाचा व्हायरस

 

3. सर्दी खोकला ज्या सामान्य व्हायरस मुळे पसरतो त्यामुळेसुद्धा डोळे येतात.

 

लक्षणे

 

• डोळ्यामध्ये अचानक कचरा गेल्याची संवेदना होणे व त्यानंतर सारखे डोळ्यांत टोचत राहणे

 

• खूप पाणी येणे

 

• डोळे लाल होणे, सूजणे, चिकट घाण येणे, चेहरा सूजणे

 

• पापण्या चिकटणे, डोळे उघडे सूजणे की उघडताही न येणे

 

• डोळ्यांत रक्तस्त्राव होणे

 

• पापण्यांच्या आतून जाळी येणे

 

 

 

संसर्गजन्यता

 

हा डोळे येण्याचा प्रकार अत्यंत संसर्गजन्य आहे. वेगाने पसरतो. अगोदर एक डोळा बाधित होऊन मग दुसरा डोळ्यात संसर्ग होतो. संपर्कात येणाऱ्या लोकांना बाधित स्पर्शाने किंवा एकमेकांच्या वस्तू वापरल्याने जसे की टॉवेल, रुमाल इ. गोष्टीं मुळे होऊ शकतो.

 

घ्यावयाची काळजी

 

– हात वेळोवेळी स्वच्छ धुवावेत

 

– गॉगल/ चष्मा वापरावा जेणे करून सारखे डोळ्यांना स्पर्श होणार नाही.

 

– वेळोवेळी सॅनिटायझर वापरून हात स्वच्छ करणे.

 

– आपले रोजचे वापरातील कपडे वेगळे ठेवणे, धुणे

 

– कॉमन गोष्टींना स्पर्श टाळावा जसे की रिमोट, दरवाजांचे हँडल इत्यादी

 

– दिवसातून दोन ते तीन वेळा तरी डोळे स्वच्छ कपड्याने पुसून घ्या/ धुवू नका.

 

– इतर आजारांची काळजी घ्या जसे की डायबिटीज इ.

 

– खूप त्रास होत असल्यास घरी विश्रांती घ्यावी. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

– इतर लोकांमध्ये मिसळणे टाळा. गर्दीत जाणे टाळावे.

 

औषधे

 

व्हायरल आजार हे सामान्यतः आपल्या नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीने बरे होत असतात. तसे हा आजार ही बरा होतो परंतु आजार असताना आणखी कॉम्प्लिकेशन्स होऊ नये, इन्फेक्शन होऊ नये, वेदना कमी होतील, सूज कमी होईल यासाठी औषधांची गरज असते.

 

– अँटीबायोटिक्स – जेणेकरून जास्तीचे इन्फेक्शन वाढू नये

 

– अँटी व्हायरल औषधे

 

– स्टेरॉइड्स

 

सर्व औषधे थेंबांच्या स्वरूपात असतात. काही ठराविक रुग्णांमध्ये स्टेरॉइड च्या गोळ्याही घ्याव्या लागतात. ही सर्व उपचार फक्त आणि फक्त डोळ्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणे गरजेचे आहे.

 

शस्त्रक्रिया

 

काही ठराविक रुग्णांमध्ये जर पापण्या एकमेकांना चिकटल्या किंवा आतील भागाला चिकटल्या तर त्या मोकळ्या कराव्या लागतात. जर पापण्यांच्या खाली जाळी तयार झाली तर हलक्या हाताने डॉक्टर स्वच्छ करतात.

 

हा आजार योग्य काळजी, व्यवस्थित उपचार घेतल्यास पूर्ण पणे बरा होतो. दुष्परिणाम होण्याची शक्यता अगदीच नगण्य असते. पण हा डोळे येण्याचा प्रकार वेदनादायक, दिसताना गंभीर असल्याने रुग्ण व नातेवाईक काळजीत पडतात. वेदना होत असल्याने कधी कधी असह्य होतो. आजार वरखाली, कमी जास्त होत असल्याने रुग्णांची चिंता वाढते. परंतु योग्य उपचार व काळजी घेतल्यास दोन आठवडे ते महिनाभरात आजार पूर्ण बरा होतो.

 

=============================================================================================================================================

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments