Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorized*इतर मागासवर्गीय महामंडळाची थकीत कर्ज प्रकरणांकरिता एकरक्कमी परतावा योजना लागू*

*इतर मागासवर्गीय महामंडळाची थकीत कर्ज प्रकरणांकरिता एकरक्कमी परतावा योजना लागू*

 

पुणे, दि. 20: (जिमाका, वृत्तसेवा): जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणांमध्ये लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी एकरक्कमी परतावा योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेनुसार ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्जाची संपूर्ण रक्कम एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रकमेवर ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. ही योजना दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.

महामंडळाच्या सर्व थकबाकीदार लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेऊन थकीत कर्जाची एकरकमी परतफेड करून कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments