Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedधूम्रपान आणि बैठ्या जीवनशैलीमुळे वाढतोय रक्ताच्या गुठळ्यांचा धोका* *डॉ. श्रीकांत घनवट,...

धूम्रपान आणि बैठ्या जीवनशैलीमुळे वाढतोय रक्ताच्या गुठळ्यांचा धोका* *डॉ. श्रीकांत घनवट, व्हॅस्क्युलर सर्जन, अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, पुणे*

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत धूम्रपान करणे आणि तासन्‌तास एकाच ठिकाणी बसून काम करणे ही केवळ वाईट सवयच नाही, तर ती गंभीर आजारांना आमंत्रण देत आहे. तज्ज्ञांच्या मते, या दोन्ही सवयींमुळे शरीरात रक्ताच्या गाठी (ब्लड क्लॉट्स) तयार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. परिणामी डीप वेन थ्रॉम्बोसिस (DVT) आणि जीवघेणा पल्मोनरी एम्बोलिझम यांसारख्या आजारांचा धोका निर्माण होतो.

 

हल्ली कामाच्या ठिकाणी जास्त काळ बसून राहणे, वारंवार प्रवास करणे आणि धूम्रपानासारख्या सवयींचे प्रमाण वाढले आहे. यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढू शकतो. हे गुठळ्या बहुतेकदा कोणतीही लक्षणं न आढळता विकसित होतात आणि गंभीर गुंतागुंत उद्भवल्यावरच लक्षात येऊ शकतात. म्हणून वेळीच मदत घेणे गरजेचे आहे.

 

अशा प्रकारे धूम्रपान आणि जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून काम करणे यामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात. जेव्हा एखादी व्यक्ती डेस्कवर, लांबच्या प्रवासात गाडी चालवताना किंवा विमान प्रवासात बराच वेळ बसावे लागल्यास पायांमधील रक्त प्रवाह मंदावतो. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता वाढते, विशेषतः पायांच्या नसांमध्ये गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. धूम्रपान केल्याने हा धोका आणखी वाढतो. तंबाखूमधील रसायनं हे रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणांना नुकसान पोहोचवतात , रक्ताच्या गुठळ्या होण्यास कारणीभूत ठरतात. रक्त प्रवाह कमी होणे आणि रक्तवाहिन्यांना होणारे नुकसान यामुळे गुठळ्या तयार होणे तसेच एखाद्या व्यक्तीच्या गतिशीलतेवर परिणाम होतो. यामुळे रुग्णांना त्यांच्या दैनंदिन कामात अडथळा येतो. या स्थितीला सामान्यतः डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) म्हणून ओळखले जाते, ही एक गंभीर स्थिती आहे जिथे रक्ताची गुठळी खोल नसामध्ये, सहसा पायांमध्ये तयार होते आणि सूज, वेदना, उष्णता, त्वचेचा लालसरपणा किंवा रंग बदलणे आणि लालसरपणा यासारखी लक्षणे असू शकतात. शिवाय, वेळेवर लक्ष देणे आवश्यक आहे. जर या गुठळ्याचा फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्या तर पल्मनरी एम्बोलिझम (PE) होऊ शकतो, जा एक वैद्यकीय आणीबाणी आहे. यामुळे दम लागणे, छातीत दुखणे, हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे, चक्कर येणे किंवा खोकल्यातून रक्त येणे अशी लक्षणं दिसतात.

 

वेळेवर उपचार न केल्यास रक्ताच्या गुठळ्यांमुळे फुफ्फुसातील एम्बोलिझम, पायांना सूज आणि वेदना आणि त्वचेवर अल्सर यासारख्या परिस्थिती कारणीभूत ठरतात तर, गंभीर प्रकरणांमध्ये अचानक मृत्यू ओढावू शकतो. वारंवार रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होण्याची शक्यता वाढते.

 

असे करा व्यवस्थापन:

हे समजून घेणे गरजेचे आहे की उपचार हे रक्ताच्या गुठळ्याच्या आकारावर आणि स्थानावर अवलंबून असतात. रक्ताच्या गुठळ्यांचा आकार वाढण्यापासून रोखण्यासाठी आणि नवीन गुठळ्या होण्याचा धोका कमी करण्यासाठी तज्ञ रक्त पातळ करणारी औषधे देखील लिहून देतील. गंभीर प्रकरणांमध्ये, रुग्णाला ठराविक प्रक्रिया किंवा इंजेक्शन्स घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. वेळीच निदान ही पुनर्प्राप्तीसाठी आणि दैनंदिन दिनचर्या पुर्ववत सुरू करण्यासाठी महत्त्वाचे ठरते.

 

रक्ताच्या गुठळ्या रोखणे गरजेचे असून जास्त वेळ एका ठिकाणी बसणे अथवा उभे राहणे टाळावे , अधुनमधुन स्ट्रेचिंग करणे किंवा दर 60 मिनिटांनी जागेवरुन उठून चालणे योग्य राहिल. धूम्रपानासारखी वाईट सवय सोडा, हायड्रेटेड रहा, वजन नियंत्रित राखा आणि नियमित व्यायाम करा. लांबच्या प्रवासादरम्यान, रक्ताच्या गुठळ्या टाळण्यासाठी ब्रेक घ्या, पायांची हालचाल करा आणि कॉम्प्रेशन स्टॉकिंग्जचा वापर करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments