Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorized*हिंद-दी-चादर’कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंधी समाजाचे सहकार्य-सुरेश हेमनानी*

*हिंद-दी-चादर’कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंधी समाजाचे सहकार्य-सुरेश हेमनानी*

 

 

पुणे, दि.२१: श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी खारघर येथे आयोजित ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी सिंधी समाजाचा पाठींबा असून कार्यकम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन भारतीय सिंधू सभाचे महाराष्टाचे अध्यक्ष सुरेश हेमनानी यांनी केले.

 

‘हिंद-दी-चादर’ च्या पार्श्वभूमीवर

भारतीय सिंधी सभेच्यावतीने पुणे येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी ‘हिंद-दी-चादर’कार्यक्रम राज्यस्तरीय समन्वय समितीचे अशासकीय सदस्य चरणजितसिंग साहनी, भारतीय सिंधी सभेच्या पुणे शाखा अध्यक्ष जितेंद्र अडवाणी, उपाध्यक्ष ज्ञान रोहेरा, सरचिटणीस जितेंद्र हिरानंदानी,महिला शाखा अध्यक्षा रेश्मा खियानी, महिला शाखा कार्याध्यक्ष निर्मला दादलानी, महिला शाखा उपाध्यक्षा रोमा खेमचंदानी आदी उपस्थित होते.

 

सुरुवातीला श्री. साहनी यांनी हिंद-दी-चादर’ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बैठकीत माहिती दिली.

 

श्री. हेमनानी म्हणाले, भारतीय सिंधी सभातर्फे १ मार्च रोजी खारघर कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी बसेसची व्यवस्था, अल्पोपहार, भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सामाजिक ऐक्य, राष्ट्रीय एकात्मता आणि धर्मसंरक्षणाच्या विचारांचा प्रसार करणारा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंधी समाजातील नागरिकांनी सक्रीयपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री. हेमनानी यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments