Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedअर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६च्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री यांनी घेतली विधानपरिषद सभापती...

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६च्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांनी घेतली विधानपरिषद सभापती व उपसभापतींची भेट*

 

 

मुंबई दि.२३: महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ च्या पहिल्या दिवशी (सोमवार, २३ फेब्रुवारी)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. या भेटीत अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजाबाबत आणि राज्याच्या विकासाबाबत संक्षिप्त चर्चा झाली. यावेळी संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील हेही उपस्थित होते.

 

त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. या भेटीत अधिवेशनाच्या यशस्वी कामकाजाबाबत चर्चा झाली.

 

हे अधिवेशन २३ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२६ या कालावधीत चालणार असून, राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी सादर होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण, शोकप्रस्ताव (अजित पवार यांच्या निधनाबाबत) आणि इतर प्रारंभिक कामकाज पार पडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments