“शेतकरी हक्कांच्या लढ्यास नवी धार : पश्चिम विभागात नवे नेतृत्व जाहीर”
“संघटन विस्ताराची ऐतिहासिक पायरी : कोल्हापूर–सांगली विभाग व पलूस तालुक्यास नवे अध्यक्ष”
“शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार एम एस महाराष्ट्र राज्य, ‘पश्चिम महाराष्ट्रात संघटनात्मक विस्तार”
“शेतकरी चळवळीला नवे बळ : दोन मावळ्यांवर महत्त्वाची जबाबदारी”
शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम विभागातील संघटनात्मक बळकटीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत पश्चिम महाराष्ट्रातील दोन लढवय्ये शेतकरी मावळ्यांचा संघटनेत समावेश करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील साखरवाडी येथील जयसिंह (बापू) डांगे यांची कोल्हापूर–सांगली विभागीय अध्यक्षपदी, तसेच पलूस तालुक्यातील कुंडल येथील दीपक गावडे यांची पलूस तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही पदाधिकाऱ्यांसह सुमारे २५ हून अधिक सक्रिय शेतकरी सभासदांचा संघटनेमध्ये अधिकृत समावेश करण्यात आला आहे.
ही नियुक्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी कलकत्ता येथून जाहीर केली असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश उपसचिव काशिनाथ जाधव पाटील (छत्रपती संभाजीनगर) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
शेतकरी हक्क, हमीभाव, सहकार बचाव, कर्जमुक्ती, आणि शेतकरी सन्मान या प्रमुख मुद्द्यांवर देशभरात संघटनेच्या कार्याची दखल घेतली जात आहे. शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार एम एस फाउंडेशन तसेच संघटनेच्या विविध आंदोलनात्मक आणि धोरणात्मक उपक्रमांमुळे पश्चिम महाराष्ट्रात संघटनात्मक बळ अधिक दृढ होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी दीपक काळे, संजय हुबाळे, नारायण जाधव, हनुमंत पवार यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
—
*कोल्हापूर सांगली जिल्हा पदाधिकाऱ्यांमध्ये डांगे आणि गावडे यांच्या नियुक्तीने दोन्ही जिल्ह्यांमध्ये उत्साहाचे वातावरण.. हजारो संघटना पदाधिकारी व शेतकऱ्यांकडून बापू डांगे दीपक गावडे यांना नियुक्ती संदर्भात शुभेच्छांचा वर्षाव.*


