*व्हिएतनाम आठवणी निर्माण करणारा देश*
*मुंबई / पुणे, ता. २४ :* व्हिएतनामचा सांस्कृतिक वारसा समृद्ध असून, इतिहासाच्या अनेक स्मृतींना या देशाच्या भेटीदरम्यान उजाळा देता येतो. भारत आणि व्हिएतनाम यांचा अनेक वर्षांचा संबंध आहे. व्हिएतनाम हे केवळ पर्यटनस्थळ नसून, आठवणी निर्माण करणारा देश आहे,” *असे मत व्हिएतनामचे मुंबईतील कौन्सिल जनरल ली क्वांग बिएन यांनी व्यक्त केले.*
*व्हिएतनामच्या सांस्कृतिक वारशाचा व इतिहासाच्या स्मृतींचा मागोवा घेणाऱ्या* ‘व्हिएतनाम अ नेशन ऑफ मेमरीज’ या पुस्तकाचे प्रकाशन ली क्यांग बिएन यांच्या हस्ते झाले. कोरेगाव पार्क येथील मलाका स्पाइस हॉटेलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. ब्रँड स्ट्रॅटेजिस्ट व ‘ सीगल’चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक सरीर देसाई यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
*गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांमध्ये आणखी जवळीक आली आहे.* देसाई यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा वापर येथील नागरिकांनी व्हिएतनाम समजून घेताना होणार आहे, असा विश्वास बिएन यांनी व्यक्त केला.
*कार्यक्रमात पुस्तकाच्या निर्मितीमागील प्रेरणा,* संकल्पना आणि अभ्यासप्रक्रियेबाबत *समीर देसाई यांनी मनोगत व्यक्त केले.* व्हिएतनाम हे केवळ भौगोलिक राष्ट्र नसून, स्मृतींचे राष्ट्र आहे. त्या स्मृतीच्या प्रवासात वाचकांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे, ” असे ते म्हणाले. देसाई यांच्यासह व्हिएतनाममध्ये सहप्रवासी असलेल्यांनी या वेळी अनुभव मांडले. सूत्रसंचालन अवनी मुळे यांनी केले .
*समीर देसाई यांनी उलगडला पुस्तकाचा प्रवास*
*पुस्तक प्रकाशनानंतर सोनम श्रीवास्तव यांनी देसाई यांच्याशी संवाद साधला.* या वेळी पुस्तकाचा प्रवास त्यांनी उलगडला. “व्हिएतनामच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रवासाचे चित्रण या पुस्तकातून करण्यात आले. एका राष्ट्राच्या जडणीघडणीतील स्मृती, परंपरा, संघर्ष आणि आधुनिकतेकडे झालेली वाटचाल यांचे समग्र दर्शन यात घडते राष्ट्राची ओळख, त्यामागील भावविश्व उलगडण्याचा प्रयान मी यातून केला आहे.” असे ते म्हणाले


