Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो-कनेक्टेड व्यावसायिक संकुलाची नवी पायरी गेरा डेव्हलपमेंट्सकडून ‘गेरा’स इम्पेरियम गेटवे’ला थेट...

पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो-कनेक्टेड व्यावसायिक संकुलाची नवी पायरी गेरा डेव्हलपमेंट्सकडून ‘गेरा’स इम्पेरियम गेटवे’ला थेट मेट्रो प्रवेशमार्ग सुरू

 

 

पुणे, २४ फेब्रुवारी २०२६ : पुणे तसेच देश-विदेशात प्रीमियम रिअल इस्टेट प्रकल्पांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गेरा डेव्हलपमेंट्स प्रा. लि. यांनी पिंपरी-चिंचवडमधील ‘गेरा’स इम्पेरियम गेटवे’ या व्यावसायिक प्रकल्पाला थेट भोसरी मेट्रो स्थानकाशी जोडणारा समर्पित प्रवेशमार्ग सुरू केला. या उपक्रमामुळे हा प्रकल्प शहरातील मेट्रोशी एकात्मिक जोडणी असलेला पहिल्या व्यावसायिक संकुलांपैकी एक ठरला आहे. ,

उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे प्रॉपर्टी विभागाचे एजीएम मनोज दंडारे प्लॅनिंग विभागाचे डीजीएम मिहिर कुलकर्णी तसेच गेरा डेव्हलपमेंट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलजार मल्होत्रा उपस्थित होते.

नवीन प्रवेशमार्ग सुरू झाल्यानंतर प्रवासी, कर्मचारी व व्यावसायिकांना भोसरी मेट्रो स्थानकातून थेट प्रकल्पात प्रवेश मिळणार असून ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. त्यामुळे कार्यालयीन प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि वेळ वाचवणारा होणार असल्याचे सांगण्यात आले.

मनोज दंडारे म्हणाले की, पुण्यातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मेट्रो प्रकल्प राबवण्यात आला असून अशा प्रकारचे ट्रान्झिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंट शहराच्या शहरी रचनेत महत्त्वाचा बदल घडवतील. सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि खासगी विकास यांची सांगड घातल्यास भविष्योन्मुख व्यावसायिक क्षेत्रांची निर्मिती शक्य होते.

गुलजार मल्होत्रा यांनी सांगितले की, आधुनिक व्यावसायिक प्रकल्प हे केवळ इमारती नसून ते जोडणी, कार्यक्षमता आणि टिकाऊपणावर आधारित असले पाहिजेत. थेट मेट्रो प्रवेशामुळे प्रकल्पाचे व्यावसायिक मूल्य वाढते, कंपन्यांसाठी आकर्षण निर्माण होते आणि पर्यावरणपूरक प्रवासाला चालना मिळते. प्रकल्पातील ९५ टक्क्यांहून अधिक जागा विक्री झाल्या असून लीजिंगबाबत कॉर्पोरेट क्षेत्राकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सुमारे ११.५ एकर क्षेत्रावर उभारलेल्या ‘इम्पेरियम’ मालिकेतील हा दहावा प्रकल्प तीन इमारतींच्या संकुलात विकसित करण्यात आला आहे.

आधुनिक कार्यालयीन जागांसह रिटेल व फूड डेस्टिनेशन असलेला सामाजिक खुला परिसर, दोन स्वतंत्र रिटेल मजले आणि काचांनी सजलेला भव्य प्रवेशद्वार यामुळे हा परिसर पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख बिझनेस-लाईफस्टाईल हब म्हणून विकसित होण्याची अपेक्षा आहे. पुणे-मुंबई-नाशिक कॉरिडॉरशी जोडणीही या ठिकाणाहून सुलभ होणार आहे.

 

मेट्रो जोडणीसह साकारलेले हे मॉडेल भविष्यातील शहरी कामकाज पद्धतीचे उदाहरण ठरणार असून ग्राहक-केंद्रित नवकल्पनांबाबत कंपनीची भूमिका अधोरेखित करते.

गेरा डेव्हलपमेंट्स प्रा. लि. बद्दल

पन्नासहून अधिक वर्षांची परंपरा असलेली गेरा डेव्हलपमेंट्स ही पुण्यातील अग्रगण्य रिअल इस्टेट कंपनी असून पुणे, गोवा, बेंगळुरू आणि कॅलिफोर्निया येथे प्रकल्प विकसित केले आहेत. ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन, नवकल्पना आणि पारदर्शकता या तत्त्वांवर आधारित कंपनीने भारतात प्रथमच ५ वर्षांची आणि नंतर ७ वर्षांची वॉरंटी, चाइल्डसेंट्रिक होम्स, इंटेलिप्लेक्सेस, स्कायव्हिला आणि ‘इम्पेरियम’ मालिकेसारखे संकल्पना प्रकल्प सादर केले आहेत.

कंपनीला विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसह ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ संस्थेकडून सलग आठ वर्षे उत्कृष्ट कार्यस्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments