Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedकर्वेनगर स्मशानभूमी तील दुरावस्थेबाबत संदीप खर्डेकर आक्रमक

कर्वेनगर स्मशानभूमी तील दुरावस्थेबाबत संदीप खर्डेकर आक्रमक

 

पुणे – कर्वेनगर स्मशानभूमीतील दुरावस्थे बाबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर आक्रमक झाले आहेत. तेथील दुरावस्था तातडीने दूर करण्याची मागणी त्यांनी पुणे मनपाच्या विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा शेकटकर यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनात म्हटले आहे की

एका अंत्यविधी साठी कर्वेनगर स्मशानभूमीत गेलो असता तेथे अत्यन्त वाईट परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले. तेथे खोदकाम केलेले असून स्मशानात जाण्याचा रस्ता धोकादायक व अरुंद झालाय व पार्किंग ची देखील योग्य व्यवस्था नाही.तेथील कलवर्ट चे काम कुर्मगतीने सुरु असल्यामुळे ही अडचण असून तेथील प्रलंबित कामं त्वरित पूर्ण करावीत अशी मागणी करत आहे.

तसेच वरील छायाचित्रात दर्शविल्याप्रमाणे तेथे विद्युत दाहिनीचे अर्धवट झालेले काम दिसून येते व सर्वत्र त्याचे सामान पडले असून अस्वच्छता देखील झाली आहे.सदर काम केले जाणार आहे काय ? हे काम पूर्ण करण्यात काही अडचणी आहेत काय ? याचा खुलासा होणे गरजेचं आहे.

तरी आपण याबाबत त्वरित खुलासा करावा आणि येथील काम कधी पूर्ण होईल किंवा कसं याबाबत ची माहिती जाहीर करावी अशी आग्रही मागणी करत आहे.तेथेच नव्हे तर बदलत्या काळानुसार सर्वच ठिकाणी विद्युतदाहिनी व्हावी आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीने अधिकाधिक नागरिकांनी अंत्येष्टी साठी त्याचा वापर करावा असे जनजागृती फलक ही सर्वत्र लावावेत ही विनंती.

आपला,

संदीप खर्डेकर.

अध्यक्ष,

क्रिएटिव्ह फाउंडेशन. पुणे.

मो – 9850999995

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments