Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorized"महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६" चे शुक्रवारी आयोजन*

“महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६” चे शुक्रवारी आयोजन*

 

 

पुणे, दि. २५ : उद्योग संचालनालय, उद्योग, उर्जा व कामगार विभागामार्फत “महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६” एकदिवशी कार्यशाळा शुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता सुभाष अंबिके क्लब हाऊस, इलेक्ट्रॉनिक को-ऑप इंडस्ट्रियल इस्टेट लि. पुणे सातारा रोड, पर्वती पुणे येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले आहे.

 

या कार्यशाळेत सूक्ष्म, लघू, मध्यम उपक्रम घटक, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समुह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकरी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादन, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबधित उपक्रमांचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात संबंधी कामकाज करणारे घटक, संशोधक, बॅकां आदीं घटकांना निमंत्रित करण्यात आले आहे.

 

या कार्यशाळेचा अधिकाधिक उद्योजकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments