Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedसर्वोत्तम एआय अनुभवासह सॅमसंग 'गॅलेक्‍सी एस२६' सिरीज लाँच

सर्वोत्तम एआय अनुभवासह सॅमसंग ‘गॅलेक्‍सी एस२६’ सिरीज लाँच

पुणे, २६ फेब्रुवारी २०२६ – दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने जागतिक बाजारात आपली सर्वात शक्तिशाली ‘गॅलेक्सी S26’ सिरीज लॉन्च केली आहे. कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे झालेल्या कार्यक्रमात कंपनीने तीन फोन आणि नवीन गॅलेक्सी बड्स 4 मालिका सादर केली. या सिरीजमध्ये उत्कृष्ट कार्यक्षमता, उद्योगातील आघाडीची कॅमेरा प्रणाली आणि दैनंदिन कामे अधिक सुलभ करणारे गॅलेक्‍सी एआय अनुभव वापरकर्त्यांना मिळणार आहेत.

“गॅलेक्‍सी एस२६ सिरीजमध्ये आम्ही एआय अनुभव अधिक सहज आणि नैसर्गिक बनवण्यावर भर दिला आहे. एआय शांतपणे पार्श्वभूमीत कार्य करत राहते, ज्यामुळे लोकांना त्यांच्या महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देता येते,” असे टीएम रोह, सीईओ, प्रेसिडेंट आणि हेड ऑफ डिव्हाइस एक्सपीरियन्स डिव्हिजन, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स यांनी सांगितले.

गॅलेक्‍सी एस२६ अल्ट्रा हा केवळ ७.९ मिमी जाडीचा सॅमसंगचा सर्वात स्लिम अल्ट्रा डिव्हाइस असून, मोबाईल फोनसाठी जगातील पहिल्यांदाच अंगभूत प्रायव्हसी डिस्प्ले सादर करतो. प्रवास, कॅफे किंवा सार्वजनिक ठिकाणी वापरासाठी डिझाइन केलेले हे फीचर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या समन्वयातून गोपनीयतेचे प्रभावी संरक्षण करते, तेही पाहण्याचा अनुभव कमी न करता.

गॅलेक्‍सी एस२६ अल्ट्रामध्ये स्नॅपड्रॅगन ८ एलाईट जेन ५ मोबाईल प्लॅटफॉर्म फॉर गॅलेक्सी प्रोसेसर देण्यात आला असून, तो आतापर्यंतची सर्वोत्तम कार्यक्षमता प्रदान करतो. तसेच, सुपरफास्ट चार्जिंग ३.० मुळे केवळ ३० मिनिटांत ७५% पर्यंत चार्जिंग शक्य होते.

कॅमेरा विभागातही मोठी सुधारणा करण्यात आली आहे. अधिक रुंद अपर्चरमुळे कमी प्रकाशात उत्कृष्ट छायाचित्रण शक्य होते, तर सुधारित नाइटोग्राफी व्हिडीओमुळे अंधुक प्रकाशातही स्पष्ट आणि जिवंत व्हिडिओ मिळतात. अपग्रेडेड सुपर स्टेडी तंत्रज्ञानामुळे व्हिडिओ शूटिंगदरम्यान स्थिर फ्रेमिंग मिळते. एआय आयएसपी सुधारणा सेल्फी कॅमेऱ्यातही दिसून येतात, ज्यामुळे मिश्र प्रकाशात नैसर्गिक त्वचेचे टोन आणि सूक्ष्म तपशील स्पष्टपणे टिपले जातात. विशेष म्हणजे, अॅडवान्‍स्‍ड प्रोफेशनल व्हिडिओ (एपीव्‍ही) स्टँडर्डला सपोर्ट करणारा हा पहिला गॅलेक्‍सी स्मार्टफोन आहे, ज्यामुळे उच्च-गुणवत्तेच्या व्हिडिओचे कार्यक्षम कॉम्प्रेशन शक्य होते.

एस२६ सिरीज: एजेंटिक एआयसाठी भक्कम पायाभरणी:

 

नाऊ नज फीचर वेळेवर आणि संबंधित सूचना देऊन वापरकर्त्यांचा कार्यप्रवाह अखंड ठेवते. गॅलेक्‍सी एस२६ सिरीजमध्ये अपग्रेडेड बिक्‍स्‍बी हा संवादक्षम डिव्हाइस एजंट म्हणून अधिक सक्षम झाला असून, नैसर्गिक भाषेतून सेटिंग्ज बदलणे आणि डिव्हाइस नेव्हिगेशन करणे अधिक सोपे झाले आहे.

या सिरीजमध्ये एआय एडिटिंग टूल्समध्ये सुधारणा करण्यात आली असून, नाऊ ब्रिफ आणि एन्हान्स्ड सर्कल टू सर्चसारखी रिअल-टाइम फीचर्स जोडण्यात आली आहेत. तसेच बिक्‍स्‍बी, जेमिनी आणि परप्‍लेक्सिटीसारख्या एआय एजंट्ससोबत अधिक सखोल एकत्रीकरण देण्यात आले आहे. सुरक्षेला प्राधान्य देत प्रायव्‍हेट अल्‍बम, नॉक्‍स मॅट्रिक्‍स संरक्षण, सात पिढ्यांचे ओएस अपग्रेड्स आणि सात वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स यांचा समावेश करण्यात आला आहे.

गॅलेक्‍सी बड्स४ सिरीज:

नवीन गॅलेक्‍सी बड्स४ प्रो आणि गॅलेक्‍सी बड्स४ हे शक्तिशाली हाय-फाय ऑडिओ आणि संगणकीय डिझाइनवर आधारित एर्गोनॉमिक रचना यांवर केंद्रित आहेत. गॅलेक्‍सी बड्स४ प्रोमध्ये अधिक रुंद वूफर, सुधारित अॅक्टिव्‍ह नॉईज कॅन्‍सलेशन आणि २० हर्ट्झ ते ४० किलोहर्ट्झपर्यंत फ्रिक्वेन्सी रेंजमध्ये स्पष्ट ध्वनी देणारे अॅडप्टिव्‍ह ईक्‍यू देण्यात आले आहे.

दोन्ही मॉडेल्समध्ये सुपर क्‍लीअर कॉल सपोर्ट असून, ते बिक्‍स्‍बी, गुगल जेमिनी व परप्‍लेक्सिटीसारख्या एआय एजंट्ससोबत एकत्रित कार्य करतात. व्हाईट आणि ब्लॅकमॅट फिनिशमध्ये हे उपलब्ध आहेत.

गॅलेक्‍सी एस२6 सिरीजमध्ये सर्व मॉडेल्ससाठी एकसमान डिझाइन भाषा ठेवण्यात आली असून, कोबाल्‍ट व्‍हायोलेट, व्‍हाइट, ब्‍लॅक व स्‍काय ब्‍ल्‍यू हे रंग पर्याय उप

लब्ध आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments