Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedमानव केंद्रित कृत्रिम बुध्दिमत्तेची गरज : एशिया इकोनॉमिक डायलॉग 2026 मधील तज्ञांचे...

मानव केंद्रित कृत्रिम बुध्दिमत्तेची गरज : एशिया इकोनॉमिक डायलॉग 2026 मधील तज्ञांचे मत

पुणे,27 फेब्रुवारी 2026 : भीती आणि प्रचाराच्या पलीकडच्या मानव केंद्रित कृत्रिम बुध्दिमत्तेची गरज असल्याचे मत एशिया इकोनॉमिक डायलॉग 2026 मधील तज्ञांनी व्यक्त केले.

 

भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय एशिया इकॉनॉमिक डायलॉग (एईडी) परिषदेच्या दुसऱ्या दिवशी डयुएल इंटेलिजन्स या विषयावरील चर्चासत्रात 5एफ वर्ल्डचे अध्यक्ष डॉ.गणेश नटराजन यांनी अध्यक्षपद भूषविले.याप्रसंगी पीओएसएचएस ग्रुपचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम पुरी,ला-प्रो चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी विजय संपत आणि झेडएस असोसिएटसचे भागीदार डॉ.पी.के.एस प्रकाश यांनी सहभाग घेतला.

 

डॉ.गणेश नटराजन म्हणाले की,एआय कडे कधी आपण जादुई शक्ती तर कधी भीतीने पाहतो.नवोपक्रम भूतकाळ पुसून टाकत नाही,तो त्यावर आधारित राहत पुढील विकास करतो.त्यामुळे अनेक वर्षांचा वारसा असलेल्या संस्थांनी नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेऊन पुढील विकास करणे आवश्यक आहे.

 

विक्रम पुरी म्हणाले की, तंत्रज्ञानामधील सार्वभौमत्व ही केवळ घोषणा नसून ती एक गरज आहे.भारताने एआय ला आपली ताकद वाढविण्यासाठी एक गुणक प्रभावी शक्ती म्हणून पाहिले पाहिजे.एआय कडे शत्रू म्हणून कमी आणि साधन म्हणून जास्त पाहिले पाहिजे.

 

विजय संपत म्हणाले की,मानवी निर्णय हा वेळ,माहिती आणि संज्ञानात्मक सीमांमुळे मर्यादित असतात.जबाबदारीने निर्माण केलेले एआय मानवी मनाची जागा न घेता या सीमारेषा वाढवू शकतात.भारताने स्वत:च्या कार्यबल वास्तविकतेमध्ये रूजलेले उपाय तयार केले पाहिजेत.

 

डॉ.पी.के.एस प्रकाश म्हणाले की, एआय हे मानवी जागा घेत नसून कौशल्ये वाढवत नव्या संधी निर्मा

ण करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments