Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedकूपर कॉर्पोरेशन एसीएमए बेस्ट एचआर स्पर्धेत यशस्वी; डिजिटल नवोपक्रमासाठी मिळाला सर्वोच्च...

कूपर कॉर्पोरेशन एसीएमए बेस्ट एचआर स्पर्धेत यशस्वी; डिजिटल नवोपक्रमासाठी मिळाला सर्वोच्च सन्मान

पुणे : कूपर कॉर्पोरेशन ही इंजिन, इंजिनचे भाग आणि जनरेटर तयार करणारी जागतिक स्तरावर प्रसिद्ध कंपनी असून, कंपनीला मानव संसाधन (एचआर) विकास क्षेत्रात केलेल्या नाविन्यपूर्ण कामगिरीसाठी एसीएमएच्या 17व्या वार्षिक एचआर समिट (पश्चिम विभाग) मध्ये गौरवण्यात आले. या स्पर्धेत देशभरातील 18 टॉप कंपन्यांच्या टीम्सशी स्पर्धा करून, कूपर कॉर्पोरेशनने एसीएमएच्या सहाव्या बेस्ट एचआर प्रॅक्टिसेस स्पर्धेत फर्स्ट रनर-अपचा मान मिळवला.

या शिखर परिषदेचा विषय होता “फ्युचर-रेडी एचआर: लोक, तंत्रज्ञान आणि प्रतिभा यांना आकार देणे.” या कार्यक्रमात ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीचे उद्योग तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि एचआर व्यावसायिक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात एचआर क्षेत्रातील बदल, ईएसजीचा समावेश आणि बदलत्या कामकाजाच्या वातावरणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा) वापर कसा करता येईल यावर सखोल आणि विचारप्रवर्तक चर्चा झाली.

यावेळी फारुख एन. कूपर, चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर, कूपर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड यांनी आपला आनंद व्यक्त करताना सांगितले, “एसीएमए बेस्ट एचआर प्रॅक्टिसेस स्पर्धेत मिळालेला हा सन्मान आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. ‘ई-एकलव्य’ हा उपक्रम आमच्या या विश्वासाचे प्रतीक आहे की तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण घेणे हे भविष्यासाठी सक्षम संस्था उभारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आमचे कर्मचारी ही आमची सर्वात मोठी ताकद आहेत. अशा प्रकारच्या उपक्रमामुळे आमच्या कर्मचाऱ्यांचे कौशल्य सतत सुधारते, त्यांच्या क्षमता वाढतात आणि बदलत्या उद्योग वातावरणात स्पर्धात्मक राहता येते. मी आमच्या एचआर आणि प्रशिक्षण टीमचे त्यांच्या मेहनत आणि नाविन्यपूर्ण कार्यासाठी मनापासून अभिनंदन करतो.”

“ई-एकलव्य” उपक्रम आणि त्याअंतर्गत विकसित केलेल्या डिजिटल लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम (एलएमएस) च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी हा पुरस्कार देण्यात आला. ही प्रणाली चीफ ह्यूमन रिसोर्स ऑफिसर नितीन देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली तयार केली गेली, ज्याचा उद्देश प्रशिक्षण आणि विकास प्रक्रिया एकसमान, सोपी आणि अधिक प्रभावी करणे हा होता. ही प्रणाली स्वप्निल सांडगे यांनी विकसित केली होती आणि प्रशिक्षण आणि विकास टीमने तीयशस्वीरीत्या अंमलात आणली. “ई-एकलव्य” हा उपक्रम कंपनीच्या डिजिटल परिवर्तनाच्या प्रयत्नांचे आणि भविष्यासाठी तयार कर्मचारी तयार करण्याच्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे.

हा सन्मान कूपर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या डिजिटल परिवर्तन, उत्कृष्ट कामकाज पद्धती आणि वेगाने बदलणाऱ्या ऑटोमोबाईल क्षेत्रानुसार भविष्यासाठी सक्षम कर्मचारी तयार करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रमाण

आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments