Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील यांना जयंती निमित्त...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील यांना जयंती निमित्त अभिवादन….

पिंपरी, दि. १ मार्च २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

 

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या दापोडी येथील अर्धाकृती पुतळ्यास नगरसदस्या तृप्ती कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

कार्यक्रमास महापालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे शालेय मित्र रविंद्र भोसले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

 

उपस्थितांनी वसंतदादा पाटील यांच्या विचारांचा आदर्श घेऊन सामाजिक समता, लोककल्याण आणि विकासाभिमुख प्रशासनासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला.

 

सहकार क्षेत्रातील अद्वितीय कामगिरीमुळेच त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आलेले

होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments