● हा उपक्रम विशेषतः पोलाद, ऑटोमोटिव्ह आणि ऑटोसंबंधी उद्योग, डेटा सेंटर, अभियांत्रिकी आणि उत्पादन अशा उद्योगांसाठी तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी ऊर्जा खर्च बचत, शाश्वतता अंगीकार आणि दीर्घकालीन नफा संरक्षण हे धोरणात्मक प्राधान्यक्रम आहेत.
● औद्योगिक ग्राहकांसाठी ३-५ वर्षांत परतफेड, सुधारित आयआरआर आणि दीर्घकालीन खर्च स्पर्धात्मकता शक्य.
● ३५ वर्षांचे कौशल्य, ३० वर्षांची वॉरंटी आणि राज्यव्यापी सेवा नेटवर्कमुळे हे शक्य झाले आहे
या कार्यक्रमात “महाराष्ट्राचा नूतनक्षम ऊर्जा महामार्ग” या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. त्यात खालील मान्यवर वक्त्यांचा सहभाग होता:
• श्री. पीयूष शर्मा, मुख्य अभियंता (एसटीयू), एमएसईटीसीएल
• श्री. ज्योतिन कुट्टी सस्तभवन, मुख्य शाश्वतता अधिकारी, टाटा मोटर्स लिमिटेड.
• अनिल कुमार सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड
• श्री. दिलीपकुमार पाचपांडे, व्यवस्थापकीय संचालक, सान्यो स्पेशल स्टील
• श्री. विद्याधर वागळे, टाटा पॉवर-पश्चिम
महाराष्ट्र | २६.०२.२०२६: भारतातील आघाडीच्या नूतनक्षम ऊर्जा कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडने (टी. पी. आर. ई. एल.) २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पुण्यात आपला प्रमुख सीअँडआय-केंद्रित ग्राहक संपर्क उपक्रम ‘स्केल सस्टेनेबल विथ टाटा पॉवर’ आयोजित केला. हा उपक्रम महाराष्ट्रातील ऊर्जा-केंद्री औद्योगिक परिसंस्थेतील व्यावसायिक आणि औद्योगिक (सी अँड आय) ग्राहकांसाठी अखंड नूतनक्षम आणि बॅटरी ऊर्जा साठवण (बीईएसएस) उपाययोजना स्वीकारण्यास सक्षम करण्यासाठी कंपनीच्या वचनबद्धतेला पुष्टी देतो.
हा उपक्रम विशेषतः पोलाद, ऑटोमोटिव्ह आणि ऑटोसंबंधी, डेटा सेंटर, अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रासारख्या उद्योगांसाठी तयार करण्यात आला आहे. या क्षेत्रात ऊर्जा खर्चात बचत, शाश्वत कार्यपद्धतींचा अंगीकार आणि दीर्घकालीन नफा संरक्षण हे धोरणात्मक प्राधान्यक्रम आहेत.
‘स्केल सस्टेनेबल विथ टाटा पॉवर’च्या पुणे आवृत्तीसह टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडने उच्च-आयआरआर सौर गुंतवणूक सक्षम करण्यासाठी, शून्य कार्बन कार्यपद्धतीला चालना देण्यासाठी, ऊर्जा खर्चातील स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी आणि भारताचा शाश्वत विकास कार्यक्रम बळकट करण्यासाठी महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राशी भागीदारी करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे.
सी अँड आय ग्राहकांसाठी धोरणात्मक व्यवसाय लाभ
औद्योगिक ग्राहकांसाठी गच्चीवरील सौर पॅनल हा आता फक्त शाश्वत उपाय राहिलेला नाही- तो एक आर्थिक आणि कार्यान्वित फायदा आहे.
टी. पी. आर. ई. एल.मुळे ग्राहकांना खालील गोष्टी करणे शक्य होते
● ३-५ वर्षांचा परतफेडीचा कालावधी
● अंतर्गत परतावा दर (आय. आर. आर.) सुधारणे आणि ई. बी. आय. टी. डी. ए. नफा वाढवणे.
● ग्रीडमधील विजेच्या वापरात मोठी कपात करणे
● कमी कार्यान्वयन खर्चाद्वारे वार्षिक रोख प्रवाह वाढवणे
● दरातील अस्थैर्यापासून बचाव
● शून्य कार्बन आणि ई. एस. जी. वचनबद्धता पूर्ण करणे
दीर्घकालीन अंदाजित परतावा मिळवण्यासाठी मालमत्तेचे जीवनमान २५ पेक्षा जास्त असेल.
सौर यंत्रणेचे विस्तारित कार्यान्वयन आयुष्य कॅपेक्सवरील परतफेडीनंतरही अनेक दशकांची निरंतर बचत शक्य करते. त्यामुळे औद्योगिक कामकाजाचे आर्थिक स्वरूप उत्तमरित्या उंचावले आहे.
महाराष्ट्र: मोठ्या वाढीची सौर बाजारपेठ
आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या नवमाहीत टी.पी.आर.ई.एल.ने १२६.३३ मेगावॅट रूफटॉप क्षमता आणि १०० मेगावॅट ग्रुप कॅप्टिव्ह इंस्टॉलेशन कार्यान्वित करून महाराष्ट्रात रूफटॉप सौर पॅनल्समध्ये सर्वाधिक संख्या नोंदवली आहे.
या वेगातून महाराष्ट्राची मोठी औद्योगिक मागणी आणि सहाय्यभूत धोरण दिसून येते. त्यामुळे महाराष्ट्र हे विकेंद्रीकृत स्वच्छ ऊर्जा स्वीकारण्यासाठी भारतातील सर्वात ग्रहणशील बाजारपेठांपैकी एक ठरले आहे.
कंपनीने राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नूतनक्षम प्रकल्प स्थापित केले आहेत. ज्यात खालील प्रकल्पांचा समावेश आहेः
• जामखेडमध्ये २०० मेगावॅटचा सौर पीव्ही प्रकल्प
• एनटीटी ग्लोबलसाठी १०० मेगावॅटचा ग्रुप कॅप्टिव्ह सौर प्रकल्प
या प्रकल्पांमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील औद्योगिक मूल्य साखळ्यांमध्ये हरित ऊर्जा वापरली जाईल, याची काळजी घेतली जाते. त्यामुळे गुंतवणूकीवर आधारित नूतनीकरणक्षम विस्ताराला मदत होते.
देशभरात टी.पी.आर.ई.एल.ने ११.६ गिगावॅट्स नूतनक्षम सौर आस्थापनांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा वापरात कंपनीचे नेतृत्व स्थान प्रबळ झाले आहे.
टाटा पॉवर सोलारूफमुळे पुण्याच्या औद्योगिक क्षेत्रांना खात्रीशीर वीजपुरवठा, कमी कार्यान्वयन खर्च आणि शाश्वतता या तिन्ही गोष्टींचा फायदा मिळतो. गच्चीवरील स्वच्छ, कार्यक्षम शक्ती देऊन ऑटोमोटिव्ह, अभियांत्रिकी, आयटी, फार्मा, इलेक्ट्रॉनिक्स आणि एरोस्पेसमध्ये मोठ्या-मागणीच्या कार्यान्वयनाला मदत होत असल्याने लवचिकता आणि दीर्घकालीन स्पर्धात्मकता वाढते.
स्थापित कौशल्य, सिद्ध विश्वासार्हता
शाश्वत ऊर्जा उपाययोजनांच्या ३५ वर्षांहून अधिक अनुभवासह टी.पी.आर.ई.एल. गुणवत्ता, विश्वासार्हता आणि अंमलबजावणी उत्कृष्टतेच्या मजबूत ट्रॅक रेकॉर्डसह भारताच्या छतावरील सौर विभागाचे नेतृत्व करत आहे.
कंपनी या गोष्टी देतेः
• सौर मॉड्यूल्सवर ३० वर्षांची वॉरंटी
• व्यापक विमा संरक्षण
• ४०० हून अधिक शहरांमध्ये ६५० हून अधिक चॅनेल भागीदार आणि २४० पेक्षा जास्त अधिकृत सेवा भागीदारांचा समावेश असलेले एक मजबूत राष्ट्रीय सेवा नेटवर्क
• रचना, ईपीसी, नियामक सुविधा, कार्यान्वित करणे आणि दीर्घकालीन ओ अँड एम यांचा समावेश असलेल्या क्षमता
टीपीआरईएलने आतापर्यंत देशभरात ३.५ लाख रूफटॉप सौर प्रतिष्ठापना पूर्ण केल्या आहेत आणि ४.२ गिगावॅट्स संचयी रूफटॉप क्षमता साध्य केली आहे. त्यामुळे ते विकेंद्रीकृत सौर उपायांसाठी भारतातील सर्वात विश्वासार्ह भागीदारांपैकी एक बनले आहे.
औद्योगिक निर्णय घेणाऱ्यांसाठी उपयुक्त चर्चासत्र
छत्तीसगडमधील यशस्वी आयोजनानंतर पुण्यातील आयोजनात नूतनक्षम एकात्मतेसाठी व्यावहारिक मार्गांवर चर्चा करण्यासाठी वरिष्ठ औद्योगिक प्रणेते आणि क्षेत्रातील तज्ञांना एकत्र आणले गेले.
या कार्यक्रमात ‘महाराष्ट्राचा नूतनक्षम ऊर्जा आराखडा’ या शीर्षकाखाली एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यात औद्योगिक शून्य कार्बनीकरण, नियामक तयारी, गुंतवणूकीवर आधारित नूतनक्षम वाढ आणि वेगवान सीअँडआय स्वीकारण्यासाठी सक्षम चौकट यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते


