Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंगकडून काँम्पॅक्ट ६० वॅट पॉवर अॅडप्‍टर लाँच

सॅमसंगकडून काँम्पॅक्ट ६० वॅट पॉवर अॅडप्‍टर लाँच

पुणे, ४ मार्च २, २०२६ – सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आपल्‍या नवीन सॅमसंग ६० वॅट पॉवर अॅडप्‍टरच्‍या उपलब्‍धतेची घोषणा केली आहे. हा अॅडप्‍टर विविध डिवाईसेसना त्‍वरित चार्ज करतो. तसेच वीज अपव्‍यय आणि व्‍यत्‍ययांना दूर करतो. हा अॅडप्‍टर घरी किंवा चालता-फिरता दैनंदिन चार्जिंग गरजांसाठी अधिक ऊर्जा-कार्यक्षम सोल्‍यूशन आहे, जेथे स्‍मार्टफोन, लॅपटॉप किंवा ऑडिओ इअरबड्स अशा डिवाईसेसना त्‍वरित चार्ज करण्‍याची खात्री देतो.

 

लहान फॉर्म फॅक्‍टरमध्‍ये जलद चार्जिंग

 

हा कॉम्‍पॅक्‍ट चार्जर नेक्‍स्‍ट-जनरेशन गॅलियम नायट्राइड (GaN) तंत्रज्ञानावर डिझाइन करण्‍यात आला आहे, जेथे व्‍यापक सिलिकॉन घटकांना दूर करण्‍यात आले आहे. यामुळे कॉम्‍पॅक्‍ट डिझाइनमध्‍ये उच्‍च ऊर्जा कार्यक्षमता मिळते. हा अॅडप्‍टर सुरक्षितपणे व थंडपणे कार्यरत राहण्‍यासाठी, कार्यसंचालनादरम्‍यान होणारा ऊर्जा अपव्‍यय कमी करण्‍यासाठी आणि ओव्‍हरहिटिंगचा धोका कमी करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे, ज्‍यामधून प्रमाणित अॅडप्‍टर्सच्‍या तुलनेत दीर्घकाळापर्यंत उत्‍पादन टिकाऊपणाची खात्री मिळते.

 

स्‍टँडबाय मोडमध्‍ये होणारा ऊर्जा वापर कमी

 

नवीन अॅडप्‍टर फक्‍त ०.००५ वॅट कमी स्‍टँडबाय पॉवर देतो, ज्‍यामुळे चार्जर प्‍लग इन राहून डिवाईसला चार्जिंग करत नसताना वीज अपव्‍यय कमी होते. यामुळे वापरकर्त्‍यांचे लक्ष नसले तरी वीजेचा वापर कमी होतो. तसेच, हा अॅडप्‍टर अंडरराइटर्स लॅबोरेटरीज (यूएल)द्वारे प्रमाणित आहे, जेथे या अॅडप्‍टरच्‍या डिझाइनमध्‍ये २० टक्‍के पुनर्चक्रण केलेल्‍या साहित्‍याचा वापर करण्‍यात आला आहे, तसेच कार्यक्षमतेबाबत तडजोड न करता पर्यावरणपूरक वापराची खात्री मिळते.

 

डिवाईसेसमध्‍ये स्‍मार्ट पॉवर वितरण

 

सॅमसंग ६० वॅट अॅडप्‍टरमध्‍ये यूएसबी पॉवर डिलिव्‍हरी ३.१ सह प्रोग्रामेबल पॉवर सप्‍लाय (पीपीएस) सपोर्ट आहे, जे कनेक्‍टेड डिवाईसेसना बॅटऱ्यांचे संरक्षण करण्‍यासह चार्जिंग गती सानुकूल करण्यासाठी आवश्‍यक असलेली ऊर्जा मिळण्‍याची सुविधा देते. पीपीएस प्रगत चार्जिंग तंत्रज्ञान आहे, जे विशिष्‍ट चार्जिंग गरजांनुसार डिवाईससाठी व्‍होल्‍टेज व करंटचे रिअल-टाइम समायोजन करते, ज्‍यामधून चार्जिंग कार्यक्षमता व बॅटरी टिकाऊपणा वाढतो. यासह सानुकूल पॉवर डिलिव्‍हरी मिळते, जी बॅटरी ओव्‍हरहिट होण्‍याला प्रतिबंध करते आणि बॅटरी हेल्‍थ काळासह वाढते. विविध चार्जर्सऐवजी हा एक अॅडप्‍टर उपयुक्‍त ठरू शकतो, ज्‍यामुळे केबलचा त्रास दूर होतो आणि प्रवास व कामादरम्‍यान डिवाईसेसना चार्जिंग सहजपणे करता येते. या अॅडप्‍टरमधील ६० वॅट चार्जिंग गती नवीन सॅमसंग गॅलेक्‍सी एस२६ अल्‍ट्राला फक्‍त ३० मिनिटांमध्‍ये जवळपास ७५ टक्‍क्‍यांपर्यंत चार्ज करू शकते.

 

उपलब्‍धता व किंमत

 

उच्‍च कार्यक्षमता, युनिव्‍हर्सल कॉम्‍पॅटिबिलिटी आणि पर्यावरणावर कमी परिणामासह नवीन सॅमसंग ६० वॅट पॉवर अॅडप्‍टर वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या डिवाईसेसना सुलभपणे चार्ज करण्‍याची सुविधा देतो, तसेच घरी व चालता-फिरता आवश्‍यक असलेल्‍या अनेक वेळा चार्ज करण्‍याचे प्रमाण कमी करतो. ६० वॅट चार्जर Samsung.com, फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि निवडक रिटेल स्‍टोअर्समध्‍ये ३४९९ रूपयांमध्‍ये उ

पलब्‍ध आहे.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments