Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedहसतखेळत पुणेकरांनी घेतला योग सवयीचा धडा रोटरीच्या प्रिस्टीन...

हसतखेळत पुणेकरांनी घेतला योग सवयीचा धडा रोटरीच्या प्रिस्टीन परिवर्तन पुरस्कार समारंभात सौरभ बोथरा ह्यांनी सांगितले सातत्याचे महत्व

पुणे, मार्च 4, २०२६ – रोटरी पुणे प्रिस्टिन ह्यांच्या नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध योग गुरू सौरभ बोथरा ह्यांचा “परिवर्तन पुरस्कार” देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर झालेल्या योगसत्रात श्री बोथरा ह्यांनी प्रत्येकाने जमेल तेव्हा व जमेल तो, पण रोज योग किंवा व्यायाम करणे आवश्‍यक आहे ही आग्रही भूमिका मांडली. आपले मत मांडताना त्यांनी असे सांगितले की सुरवातीला तुम्ही किती आणि कसा योग किंवा व्यायाम करता ह्यापेक्षा तुम्ही तो रोज करता का हे महत्वाचे आहे. एकदा सवय झाली कि आपोआपच तुमची ताकद, लवचिकता व कौशल्य वाढत जाईल व त्यातून तुम्हाला फक्त शारिरीकच नाही तर मानसिक स्वास्थ्य पण प्राप्त होईल.

 

 

 

सुमारे दीड तास हसत खेळत चाललेल्या ह्या कार्यक्रमात चार हजारांहून अधिक प्रेक्षकांना त्यांनी मंत्रमुग्ध केले. व्यासपीठावर त्यांच्याबरोबर योग करत असलेल्या तीन वर्षांची मुलगी, व दोन जेष्ठ नागरिक ह्यातून व्यायामाला वय नाही तर इच्छा व सवय महत्वाची हे दाखवून दिले. त्याआधी रोटरी प्रांतपाल संतोष मराठे ह्यांच्या हस्ते श्री बोथरा ह्यांचा सत्कार व मानपत्र प्रदान करण्यात आले. रोटेरियन मराठे ह्यांनी बोथरा ह्यांच्या कार्याचे कौतुक केले.

 

 

 

पुरस्काराची पार्श्वभूमी सांगताना कार्यक्रमाचे निमंत्रक रोटेरियन सुदिन आपटे म्हणाले “बोथरा ह्यांनी योग व सहज व्यायाम सर्वसमावेशक केले. व्याधी असलेले, शारीरिक लवचीकता नसलेले, वयस्कर ह्यासर्वांना जमेल असे योगशिक्षण तर बोथरा देतातच पण जिथे असु तेथुन व जेव्हा जमेल तेव्हा हे शिकता येईल ह्याची पण सोय त्यांच्या उपक्रमात आहे.” ह्या परिवर्तनाच्या यशात परिणामकारक माहीती तंत्रज्ञानाचा वापर, माफक शुल्क व बोथरा ह्यांच्या संभाषण कौशल्याचा पण मोठा वाटा आहे असे आपटे म्हणाले.

 

 

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोटरी प्रिस्टिन अध्यक्ष सुनया आपटे ह्यांनी संस्थेच्या आरोग्य शिक्षण क्षेत्रातील कामाची माहिती दिली तर नियोजित अध्यक्ष देवेंद्र सारळकर ह्यांनी आभार प्रदर्शन केले

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments