Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedराजमार्ग इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचा ६,००० कोटी रुपयांचा आयपीओ बुधवार, ११ मार्च २०२६...

राजमार्ग इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचा ६,००० कोटी रुपयांचा आयपीओ बुधवार, ११ मार्च २०२६ रोजी खुला होणार

राजमार्ग इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट एकूण ६०,०००.०० दशलक्ष रूपये किमतीचे युनिट्स जारी करत आहे.

 

· बोली/इश्‍यू बुधवार, ११ मार्च २०२६ रोजी खुला होईल आणि शुक्रवार, १३ मार्च २०२६ रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्याची तारीख इश्‍यू उघडण्याच्या एक दिवस आधी, म्हणजेच मंगळवार, १० मार्च २०२६ असेल.

 

· या इश्यूसाठी प्रति युनिट ९९ रूपये ते १०० रूपये असा प्राईस बँड निश्चित करण्यात आला आहे.

 

· अँकर गुंतवणूकदार आणि धोरणात्‍मक गुंतवणूकदार वगळता इतर गुंतवणूकदारांना किमान १५० युनिट्ससाठी आणि त्यानंतर १५० युनिट्सच्या पटीत बोली लावता येईल.

 

राष्ट्रीय, ५ मार्च २०२६: एनएचएआय (नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया)द्वारे प्रायोजित राजमार्ग इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्टने आपल्या युनिट्सचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ किंवा इश्यू) उघडण्याची घोषणा केली आहे. स्पॉन्सर योगदानासह या इश्यूचे एकूण मूल्य ६०,०००.०० दशलक्ष रूपये (६,००० कोटी रुपये) आहे. हा इश्यू बुधवार, ११ मार्च २०२६ रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे, त्याचा प्राईस बँड प्रति युनिट ९९ रूपये ते १०० रूपये असा निश्चित करण्यात आला आहे. हा इश्यू शुक्रवार, १३ मार्च २०२६ रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्‍याची तारीख मंगळवार, १० मार्च २०२६ आहे. राजमार्ग इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्टची स्थापना एनएचएआयद्वारे प्रोजेक्ट एसपीव्हीला दिलेल्या सवलत कराराच्या अटींनुसार इन्व्हिट मालमत्ता (InvIT Assets) अधिग्रहित करण्यासाठी, त्यांचे संचालन आणि देखभाल करण्यासाठी करण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात या ट्रस्टच्या पोर्टफोलिओमध्ये झारखंड, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमधील पाच टोल रस्ते समाविष्ट असतील. हे सर्व प्रकल्प एनएचएआयने संकल्पित केलेल्या टोल ऑपरेट ट्रान्सफर (टीओटी) मॉडेल अंतर्गत आहेत.

 

अँकर गुंतवणूकदार आणि धोरणात्मक गुंतवणूकदारांनी खरेदी केलेले युनिट्स वगळता, इतर बोलीदारांना किमान १५० युनिट्सच्‍या लॉटसाठी आणि त्यानंतर १५० युनिट्सच्या पटीत बोली लावता येईल.

 

या युनिट्सची नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (‘एनएसई’) आणि बीएसई लिमिटेड (‘बीएसई’) या दोन्ही शेअर बाजारांवर (एकत्रितपणे ‘स्टॉक एक्स्चेंजेस’) नोंदणी प्रस्तावित आहे. या युनिट्सच्या नोंदणीसाठी बीएसई आणि एनएसईकडून १३ फेब्रुवारी २०२६ रोजी तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड या प्रक्रियेसाठी नियुक्त स्‍टॅक एक्‍सचेंज आहे.

 

या इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ निधीचा उपयोग पुढील उद्दिष्टांसाठी करण्याचा प्रस्ताव आहे: (i) प्रोजेक्ट एसपीव्हीमध्ये कर्ज आणि इक्विटीच्या स्वरूपात गुंतवणूक करणे. हा निधी प्रोजेक्ट एसपीव्हीद्वारे एनएचएआयला इन्व्हिट मालमत्तेचे (InvIT Assets) सवलत मूल्य देण्यासाठी वापरला जाईल आणि (ii) सर्वसाधारण कामकाजासाठी.

 

हा इश्यू बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे आणि इन्व्हिट (InvIT) नियमन व सेबीच्या (SEBI) इन्व्हिट मास्टर सर्क्युलरच्या अनुपालनानुसार राबवला जात आहे. यामध्ये निव्वळ इश्यूच्या (धोरणात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा वगळून) ७५.०० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नसेल इतका भाग संस्थात्मक गुंतवणूकदारांना प्रमाणबद्ध तत्त्वावर वाटपासाठी उपलब्ध असेल. पण इन्व्हेस्टमेंट मॅनेजर बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी चर्चा करून संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या भागापैकी ६०.०० टक्‍क्‍यांपर्यंत भाग इन्व्हिट नियमन आणि सेबीच्या मास्टर सर्क्युलरनुसार स्वेच्छानिर्णयाने अँकर गुंतवणूकदारांना वाटप करू शकतात.

 

याशिवाय, इन्व्हिट नियमन आणि सेबी इन्व्हिट मास्टर सर्क्युलरनुसार निव्‍वळ इश्यूमधील (धोरणात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा वगळून) किमान २५.०० टक्‍के हिस्सा गैर-संस्‍थात्‍मक गुंतवणूकदारांना प्रमाणबद्ध तत्त्वावर वाटपासाठी उपलब्ध असेल, पण यासाठी इश्यू प्राइस किंवा त्याहून जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त होणे आवश्यक आहे.

 

अँकर गुंतवणूकदार आणि धोरणात्मक गुंतवणूकदार वगळता, इतर सर्व बोलीदारांना त्यांच्या संबंधित एएसबीए खात्यांचा आणि यूपीआय आयडीचा तपशील देऊन ‘अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट’ (“एएसबीए”) प्रक्रियेचा वापर करणे अनिवार्य आहे (०.५० दशलक्ष रूपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेची बोली लावणाऱ्या वैयक्तिक गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी यूपीआय यंत्रणा लागू असेल). अशा परिस्थितीत संबंधित बोली रक्कम सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स (“एससीएसबी”) किंवा लागू असल्यास यूपीआय यंत्रणेअंतर्गत ब्लॉक केली जाईल. अँकर गुंतवणूकदारांना या इश्यूमधील अँकर गुंतवणूकदारांच्या भागात एएसबीए प्रक्रियेच्या माध्यमातून सहभागी होता येणार नाही. अधिक माहितीसाठी पृष्ठ क्रमांक २७१ वरील “इश्यू इन्फॉर्मेशन” विभाग पाहावा.

 

या ट्रस्टचे प्रायोजक नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) आहेत. राजमार्ग इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स प्रायव्हेट लिमिटेड हे इन्व्हेस्टमेंट मॅनेजर (गुंतवणूक व्यवस्थापक) आहेत आणि आयडीबीआय ट्रस्टीशिप सर्व्हिसेस लिमिटेड हे ट्रस्टी (विश्वस्त) आहेत.

 

एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

 

About Raajmarg Infra Investment Trust:

 

Raajmarg Infra Investment Trust (“Trust”) is an infrastructure investment trust which is registered with SEBI under the InvIT Regulations on December 22, 2025, under Regulation 3(1) of the InvIT Regulations. The Trust intends to acquire, operate and maintain the InvIT Assets pursuant to the terms of the Concession Agreements. The Trust is sponsored by NHAI, an autonomous authority of the GoI under the MoRTH constituted on June 15, 1989 under the NHAI Act. The Trust proposes to have an initial portfolio of five Toll Roads in the Indian states of Jharkhand, Andhra Pradesh, Tamil Nadu and Karnataka under the Toll Operate Transfer (“TOT”) model pursuant to concessions granted by the NHAI to the Project SPV. The Toll Roads comprise five toll roads spanning a total length of 260.198 kms and forms part of the Golden Quadrilateral project. The Project SPV proposes to have an exclusive right, license and authority to demand, collect and appropriate fee, operate, manage and maintain the Toll Roads.

 

Disclaimer:

 

RAAJMARG INFRA INVESTMENT TRUST is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offer of its Units and has filed the Offer Document dated February 28, 2026 with SEBI and the Stock Exchanges. The Offer Document is made available on the website of the SEBI at www.sebi.gov.in as well as on the website of the Book Running Lead Managers i.e., SBI Capital Markets Limited at www.sbicaps.com, Axis Capital Limited at www.axiscapital.co.in, ICICI Securities Limited at www.icicisecurities.com and Motilal Oswal Investment Advisors Limited at www. motilaloswalgroup.com, t

 

The Units have not been and will not

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments