Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedIKEA आता पुणेकरांच्या भेटीला; विमान नगर येथे पुण्यातील पहिल्या सिटी स्टोअरचा शुभारंभ

IKEA आता पुणेकरांच्या भेटीला; विमान नगर येथे पुण्यातील पहिल्या सिटी स्टोअरचा शुभारंभ

विमान नगर येथील फिनिक्स मॉलमधील ३२ square feet फूटांच्या विस्तीर्ण जागेत हे स्टोअर उभारले जाईल. या नवीन स्टोअरमुळे पुणेकरांना त्यांच्या घराजवळच घर सजावणीसाठीचे फर्निचर खरेदी करता येतील.

IKEAचे विविध फर्निचर प्रत्यक्षात पाहता येतील. स्टोअरमध्ये पुण्यातील घरातील खोल्यांची मांडणी तयार केल्याने तसेच स्थानिक गरजांनुसार घरसजावटीचे साहित्य उपलब्ध केल्याने फर्निचर खरेदी सहजतेने करता येईल. खरेदीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी IKEA कॅफेमधील स्वीडिश खाद्यपदार्थांचीही चव चाखता येईल.

 

 

पुणे,५ मार्च २०२६: जगभरातील ग्राहकांमध्ये प्रसिद्ध असलेली स्वीडनची प्रसिद्ध होम फर्निचर कंपनी IKEA आता पुणेकरांच्या घरांत आणि मनात स्थान मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. १२ मार्च रोजी पुण्यातील विमान नगर येथील फिनिक्स मॉलमध्ये IKEA आपले पहिले सिटी स्टोअर सुरु करत आहे. या नवीन स्टोअरमुळे पुणेकरांना आता त्यांच्या घराजवळच जागतिक दर्ज्याची आकर्षक फर्निचर उत्पादने आणि घराच्या सजावटीचे नवनवीन पर्याय अनुभवता येतील. आता पुणेकरांनाही जागतिक दर्ज्याची घरगुती सजावटीची उत्पादने खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

 

 

सुमारे ३२ हजार square feet या विस्तीर्ण जागेवर हे स्टोअर उभारले गेले आहे. मोकळ्या जागेमुळे या स्टोअरला भेट देणा-या ग्राहकांना आपल्या घरासाठी आवश्यक वस्तू सहजपणे पाहता येईल. फर्निचर प्रत्यक्षात पाहता येत असल्याने खरेदी करणेही आता सोयीचे होणार आहे. उत्कृष्ट डिझाइन, उत्तम दर्जा आणि परवडणा-या किंमतीत होम फर्निशिंग उत्पादने पुणेकरांच्या नजीकच्या ठिकाणी उपलब्ध करुन देणे, हा या स्टोअरच्या उभारणीमागील कंपनीचा मुख्य उद्देश आहे. पुणे शहरातील घरगुती सजावटीच्या गरजा लक्षात घेत या स्टोअरमध्ये १ हजार ९०० वस्तूंचे प्रदर्शन पाहता येईल. त्यापैकी १ हजार ७०० वस्तूंची खरेदी जागच्या जागी करता येईल. ग्राहक तब्बल ४ हजार ५०० वस्तूंची ऑर्डर देऊ शकतात. आपल्या घरात सजावटीसाठी कोणत्या वस्तू खरेदी योग्य राहील, याची पुणेकरांना माहिती मिळावी म्हणून स्टोअरमध्ये पुणेरी घरांच्या रचनेनुसार रुम सेटिंग्स (खोल्यांची मांडणी) तयार करण्यात आल्या आहेत. ग्राहक डिजीटल पर्यायांचा वापर करुनही स्वतःच्या घरातील आवश्यक वस्तूंच्या खरेदीचे नियोजन करु शकतात. स्टोअरमध्ये इंटिरिअर प्लॅनिंग तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मिळेल. स्वीडिश कॅफेमध्ये प्रसिद्ध स्वीडिश डिशेस आणि स्थानिक खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेता येईल. IKEA स्टोअरमधील खरेदी ही ग्राहकांच्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी आणि अविस्मरणीय अनुभव ठरेल.

 

 

 

गेल्या सहा वर्षांपासून IKEA ऑनलाइन वितरणाच्या माध्यमातून पुणेकरांना परिचित आहे. या काळात आयकियाने ४ लाख ग्राहकांना सेवा दिल्यानंतर, पुण्यातील जीवनशैलीचा जवळून अभ्यास केला. पुण्यातील घरांमध्ये व्यवहार्यता आढळते. प्रगतीची महत्त्वकांक्षा जपली जाते. त्याकरिता बदल घडवला जातो. यात ग्राहकांच्या गरजा, सवयी आणि घरातील आवश्यक वस्तू या घटकांवरही IKEAकडून सखोल अभ्यास केला गेला. पुणेकरांच्या या सर्व गरजा लक्षात घेऊनच नव्या स्टोअरची उभारणी करण्यात आली आहे. पुण्यातील तब्बल २ लाख IKEA फॅमिली सदस्यांकडून मिळालेल्या प्रेमातूनच या स्टोअरचा पाया रचला गेला आहे. हे स्टोअर शहराच्या जीवनशैलीशी सुसंगत आणि ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे ठरेल, असा विश्वास कंपनीच्यावतीने व्यक्त करण्यात आला.

 

आपले घर पहिल्यांदाच सजावण्याचा अनुभव घेणारे तरुण नोकरदार किंवा विद्यार्थी, कुटुंब विस्तारत असल्याने किंवा प्राणीप्रेमी पालक या सर्वांना आपले घर सुटसुटीत आणि आकर्षकरित्या सजवायचे असते. पुण्यातील घरे ही मोठी स्वप्ने आणि परवडणारे दर यांचा सुरेख मेळ साधतात. स्मार्ट २-३ बीएचके आणि प्रशस्त सदनिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरांत घरातील प्रत्येक square feetला महत्त्व असते. पुण्यातील फिनिक्स मॉलमधील स्टोअरमध्ये स्थानिक घरातील मर्यादित जागेत सुटसुटीत आणि आकर्षक दिसणारी उत्पादने प्रदर्शित केल्या जातील. पुणेकरांच्या घरांच्या सजावटीसंदर्भातील गरजा लक्षात घेत हे फर्निचर उपल्ध करण्यात आले आहे.

 

आजकाल प्रत्येक पुणेकर स्मार्ट आणि बहुपयोगी फर्निचर निवडतात. डोळ्यांना सुखावणा-या मातकट रंगाचे, पर्यावरणपूरक डिझाइन्स पसंत केल्या जात आहेत. अशा प्रकारच्या फर्निचर निवडीमुळे घराच्या सौंदर्यासोबत सुखसोयींमध्येही भर पडते. पुणेकरांच्या या आवडीनिवडी त्यांच्या व्यवहारिक, विचारशील आणि किफायतशील जीवनशैलीचे दर्शन घडवतात. या निवडी काळानुसार बदलून विकसित होत जातात. पुणेकरांची हीच गरज ओळखून IKEAने आपली फर्निचर उत्पादने तयार केली आहेत. घरातील जागांमध्ये सहज मावणारी, लवचिक आणि शाश्त उत्पादने पुणेकरांच्या शाश्वत जीवनशैलीशी तंतोतंत जुळणारी आहेत, असे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले.

 

पुण्यात उभारल्या जाणा-या नव्या स्टोअरबाबत IKEA इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॅट्रिक अँटोनी म्हणाले, ‘‘या शहराच्या जीवनशैलीतून आम्हांला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. पुणेकर व्यावहारिक आणि महत्त्वकांक्षी स्वभावाचे आहेत. आपल्या मुळांशी जोडलेले असूनही पुणेकरांचे विचार प्रगत आहेत. ते शाश्वत जीवनशैलीबद्दल अधिकाधिक जागरुक आहेत. आम्हांला हीच गोष्ट प्रेरणादायी ठरली. आम्ही या नव्या स्टोअरच्या माध्यमातून केवळ एक दुकान सुरु करत नसून, अधिकाधिक लोकांच्या घरगुती दैनंदिन जीवनाची सोय चांगली करण्याच्या आमच्या वचनबद्धलेता बळ देत आहोत. या स्टोअरच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील उपस्थितीही सशक्त करत आहोत. अनेक वर्षांपासून पुणे हे आमच्या भारतातील प्रवासाचे केंद्र राहिले आहे. पुण्यातील मुख्य वितरण केंद्र हे देशभरातील स्टोअरर्सला पुरवठा करते. त्यामुळे आमच्या कार्यसाखळीत पुणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आज या शहरात आमचे पहिले स्टोअर सुरु करताना अभिमानासोबत वैयक्तित आनंदही होत आहे. ‘’

 

आतापर्यंत IKEA आपल्या ऑनलाइन आणि ऑफलाइन वितरण सेवांच्या माध्यमांतून तब्बल ३० कोटींहून अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचली आहे. कंपनीकडे ३० लाखांहून अधिक IKEA family members भक्कम आधार आहे. देशभरात विस्तीर्ण जागेत उभारलेली भव्य स्टोअर्स, प्लॅन एण्ड ऑर्डर पॉइंट्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कंपनी आपला विस्तार मजबूत करत आहे. देशभरातील प्रत्येक घरात पोहोचणे, अनेकांचे आयुष्यातील घरगुती दैनंदिन आयुष्य सुसह्य, सुखकर आणि आनंद बनवणे, हेच IKEAचे मुख्य उद्दिष्ट आहे.

 

 

Previous article
Next article
कचरा प्रकल्प उभारण्यासाठी ग्रामपंचायतींना सात दिवसांची मुदत पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर ‘एमआयटी’च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगितलोणी-काळभोर (पुणे) : पुणे शहराची जीवनवाहिनी असणाऱ्या मुळा-मुठा नदीपात्रात कुठलीही प्रक्रिया न करता अवैधरित्या टाकण्यात येणारा कचरा त्वरित बंद करावा, या मागणीसाठी एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांचे ‘कचरा बंद’ आंदोलन सात दिवसांसाठी स्थगित करण्यात आले. पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे व लोणी-काळभोरच्या सहाय्यक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले यांनी गोष्टीचे गांभीर्य ओळखून तातडीने आंदोलनस्थळी भेट देत केलेली मध्यस्थी यशस्वी ठरली. पोलिस उपायुक्तांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित करत कचरा प्रकल्प उभारणीसाठी लोणी-काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींना सात दिवसांची मुदत दिली असून कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण केलेले ट्रॅक्टर नदीपात्रात सोडण्यास मुभा दिली आहे. परंतु सात दिवसांत पर्यावरण व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असलेल्या या विषयात तोडगा काढून मुळा-मुठा नदीपात्रात थेट कचरा टाकणे बंद न केल्यास दोन्ही ग्रामपंचायतींच्या कचऱ्याच्या गाड्यांना विद्यापीठातून प्रवेश नाकारण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड व लोणी-काळभोर व कदमवाकवस्ती गावचे माजी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. या आंदोलनात शैक्षणिक संकुलातील एमआयटी विश्वशांती गुरुकुल, एमआयटी ज्युनिअर महाविद्यालय व एमआयटी एडीटी विद्यापीठातील हजारो विद्यार्थी व निवासी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी सर्वांनी या विषयाची गंभीरता, भविष्यातील संभाव्य धोके, मुळा-मुठा नदीचे अस्तित्व, परिसरातील पर्यावरणाबाबत स्थानिक ग्रामपंचायतींची उदासीनता तसेच स्थानिक व जिल्हा प्रशासनाकडून या अत्यंत गंभीर प्रश्नाकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानंतर गुरुवारी सकाळीच विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लोणी-काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींच्या गाड्या दुपारी ३ वाजेपर्यंत तशाच ताटकळत उभ्या होत्या. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कचऱ्याच्या गाड्यांना विद्यापीठातून नदीपात्राकडे जाण्यासाठी तात्पुरती परवानगी देण्यात आली. नदीपात्रातील कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांना २६ फेब्रुवारी २०२६ रोजी भीषण आग लागली होती, जी पुढील तब्बल चार दिवस धुमसत राहिली. त्यामुळे परिसरात प्रचंड विषारी धुराचे लोट पाहायला मिळाले. यामुळे एमआयटी एडीटी शैक्षणिक संकुलातील ६–७ विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास होऊन गुदमरल्याने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात भरती करावे लागले होते. या आगीमुळे व धुरामुळे शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी, स्थायी कर्मचारी व परिसरातील नागरिकांना श्वसनाचा गंभीर त्रास झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत हा कचरा नदीपात्रात टाकणे बंद करण्यासाठी ‘कचरा बंद’ आंदोलन छेडले होते. विद्यार्थ्याचे कोट : गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कुठलेही वर्गीकरण न करता थेट मुळा-मुठा नदीपात्रात कचरा टाकला जातो. साचलेल्या या कचऱ्याला सातत्याने आग लागण्याच्या घटना घडतात. त्यातून वायू प्रदूषण होऊन आम्हा विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे आम्ही पुढाकार घेत या सर्व गोष्टींचे मूळ असणारा कचरा टाकणे बंद करण्यासाठी ‘कचरा बंद’ आंदोलन करत दोन्ही स्थानिक ग्रामपंचायतींच्या गाड्या आडविल्या. परंतु पोलिस उपायुक्तांना विनंती केल्यानंतर आम्ही हे आंदोलन स्थगित करत ग्रामपंचायतींना सात दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतरही नदीपात्रात कचरा टाकणे सुरू राहिल्यास पुन्हा गाड्या आडविण्यात येतील. — दादासाहेब भोसूरे, विद्यार्थी प्रतिनिधी.
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments