Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedविभागीय अधिस्विकृती समितीच्या बैठकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

विभागीय अधिस्विकृती समितीच्या बैठकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

पुणे, दि. 5 (जिमाका वृत्तसेवा) – विभागीय अधिस्विकृती समितीच्या बैठकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार हरिष पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार आणि माध्यम क्षेत्रासाठी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यांच्या कार्याची आठवण करून देत उपस्थित सदस्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

 

यावेळी समितीचे सदस्य सचिव तथा विभागीय उपसंचालक डॉ. किरण मोघे, सदस्य ज्येष्ठ पत्रकार सुनीत भावे, गोरख तावरे, चंद्रशेन जाधव, पुणे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के तसेच सातारा जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे उपस्थित होते.

 

बैठकीच्या प्रारंभी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments