Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedसुपर सनी मंथ” क्रीडा महोत्सवाअंतर्गत तिसरी पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन; रन फॉर...

सुपर सनी मंथ” क्रीडा महोत्सवाअंतर्गत तिसरी पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन; रन फॉर अमृतकालमध्ये १७ हजार धावपटू सहभागी स्पर्धेत आंतरराष्ट्रीय धावपटूंचा सहभाग

पुणे, ७ मार्च २०२६: युवा सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित “सुपर सनी मंथ” क्रीडा महोत्सवाअंतर्गत तिसऱ्या पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन – रन फॉर अमृतकाल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल १७ हजार धावपटूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि मॅरेथॉन स्पर्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे ८ मार्च २०२६ रोजी रंगणार आहे.

 

यावेळी नगरसेवक सनी विनायक निम्हण म्हणाले, “आजच्या तरुणाईसमोर अनेक आव्हाने आहेत. व्यसनाधीनतेपासून दूर राहून खेळ आणि व्यायामाकडे वळणे ही काळाची गरज आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या ट्वीन सिटींना जोडत आरोग्यदायी जीवनशैलीचा आणि व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी ही मॅरेथॉन आयोजित केली आहे. गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मोठ्या संख्येने धावपटू या स्पर्धेत सहभागी होत आहेत, ही आनंदाची बाब आहे.” या स्पर्धेच्या माध्यमातून(टुगेदर अगेन्स्ट ड्रग्स)नशा मुक्ती अभियानासाठी एकत्र येणार आहेत.

 

स्पर्धेत आंतरराष्र्टीय खेळाडूंमध्ये केनियाच्या पॉल मॅटर, जॉन म्यूनडे, डॅनियल किपकेम्बोई, अमॉस कोसेगी, फेलिक्स मिली हे खेळाडू २१.१ किमी अंतराच्या शर्यतीत आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

 

ही स्पर्धा पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत २१ किमी, १० किमी, ५ किमी आणि ३ किमी अशा चार गटांमध्ये धावपटू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. पहाटे ५ वाजता २१.१ किमी, सकाळी ५.४५ वाजता १० किमी, तर ७.१५ वाजता ५ किमी आणि ७.३० वाजता ३ किमी शर्यतींना सुरुवात होणार आहे.

 

२१.१ किमी शर्यतीचा प्रारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथून होऊन आयुका, स्पायसर अॅडव्हेंटिस्ट विद्यापीठ, ब्रेमेन चौक, परिहार चौक, वेस्टएंड मॉल, औंध मिलिटरी स्टेशन, विशाल नगर मेन रोड, न्यू डीपी रोड, ज्युपिटर हॉस्पिटल मार्गे लक्ष्मी माता मंदिर, ममता चौक, ताम्हाणे चौक, औंध-बाणेर लिंक रोड, नागरस रोड मार्गे पुन्हा वेस्टएंड मॉल, परिहार चौक होत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे समाप्त होईल.

 

१० किमी शर्यतीचा मार्ग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स – आयुका – स्पायसर अॅडव्हेंटिस्ट विद्यापीठ – ब्रेमेन चौक – परिहार चौक – वेस्टएंड मॉल – नागरस रोड – औंध-बाणेर लिंक रोड – ताम्हाणे चौक आणि पुन्हा विद्यापीठ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असा असणार आहे.

 

या स्पर्धेत एकूण ५,५५,५५५ रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच सर्व सहभागी धावपटूंना टी-शर्ट, गुडी बॅग, पदक, ई-टायमिंग प्रमाणपत्र आणि वैद्यकीय सुविधा विनामूल्य देण्यात येणार आहेत.

 

स्पर्धेचे तांत्रिक नियोजन यश रायकर यांनी

केले आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments