पुणे, दि. 9 (जिमाका, वृत्तसेवा): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह चालविण्यात येत आहेत. मात्र वसतिगृहांची प्रवेश क्षमता मर्यादित असल्याने ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही, त्यांच्या अर्जांचे स्वाधार योजनेसाठी रूपांतर करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी १२ मार्च २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
तरी सर्व पात्र विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज पूर्ण करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
0000


