उद्योगामधील एकमेव एचएएमआर-आधारित प्लॅटफॉर्म एआय-आधारित डेटा विकासाच्या आर्थिक व्यवहार्यतेला साह्य करतो
नवी दिल्ली – मार्च 10, २०२६ – तंत्रज्ञान नाविन्यतेसह डेटा निर्मिती व मूल्याला गती मिळत असताना विकासात्मक, कार्यक्षम, उच्च-कार्यक्षम स्टोरेज सोल्यूशन्ससाठी मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज, सीगेट टेक्नॉलॉजीने घोषणा केली की, त्यांचा नेक्स्ट-जनरेशन मोझॅक ४+ प्लॅटफॉर्म हा उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला एकमेव हीट-असिस्टेड मॅग्नेटिक रेकॉर्डिंग (एचएएमआर)-आधारित स्टोरेज प्लॅटफॉर्म आता पात्र ठरला आहे आणि दोन आघाडीच्या हायपरस्केल क्लाऊड प्रदात्यांसह उत्पादित केला जात आहे. ४४ टीबीपर्यंतची क्षमता प्रदान करणारा हा प्लॅटफॉर्म हायपरस्केल वातावरणातील उत्पादन-स्तरावरील उपयोगासाठी अनुकूल आहे.
अतिरिक्त ग्राहक पात्रतेची प्रक्रिया सुरू असताना, सीगेट आपल्या रोडमॅपनुसार आजच्या ४+ टीबी प्रति-डिस्क क्षमतेवरून भविष्यातील १० टीबी प्रति-डिस्क क्षमतेकडे वाटचाल करत आहे, ज्यामुळे १०० टीबीपर्यंतची हार्ड ड्राइव्ह क्षमता शक्य होणार आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये नेक्स्ट-जनरेशन सस्पेंशन आर्किटेक्चर आणि प्रगत सिस्टम-ऑन-अ-चिप समाविष्ट आहे, जे उच्च घनतेवर अचूक रेकॉर्डिंग करण्यास मदत करते आणि उद्योग स्तरावरील विश्वासार्हता कायम राखते. प्रत्येक नवीन पिढीतील प्लॅटफॉर्ममुळे कोणत्याही मोठ्या आर्किटेक्चरल बदलांची गरज न पडता स्टोरेज क्षमतेत सतत वाढ करणे शक्य होत आहे.
“व्यवसायिक माहिती मिळवण्यासाठी, उत्पादकता वाढवण्यासाठी आणि स्पर्धात्मक फायदा मिळवण्यासाठी डेटा उद्योगांकरिता बहुमूल्य मालमत्ता बनली आहे. आधुनिक डेटा सेंटर पायाभूत सुविधांचा पाया म्हणून वाढत्या डेटाचे प्रमाण व्यवस्थापित करण्यासाठी आणि गुंतवणुकीवर जास्तीत-जास्त परतावा मिळवण्यासाठी डेटा स्टोरेज सोल्यूशन्स आवश्यक आहेत,” असे सीगेटचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह मोस्ली म्हणाले. “सीगेटची एचएएमआर-आधारित मोझॅक उत्पादने ग्राहकांना त्यांच्या डेटाची पूर्ण क्षमता दर्शविण्यासाठी आवश्यक असलेली व्याप्ती, कार्यक्षमता आणि परिणामकारकता प्रदान करतात.”
जगातील बहुतेक मोठ्या क्लाउड स्टोरेज प्रदात्यांनी आधीच सीगेटच्या मोझॅक प्लॅटफॉर्मला मंजूरी दिली आहे, यामधून या प्लॅटफॉर्मचे डेटा सेंटर पायाभूत सुविधांमधील महत्त्वपूर्ण स्थान दिसून येते.
व्हर्टिकली इंटिग्रेटेड फोटोनिक्ससह उत्पादन-स्तरावरील एचएएमआर तंत्रज्ञान
सीगेटचे सानुकूलित आणि उत्पादित केलेले लेझर तंत्रज्ञान हे एचएएमआर रेकॉर्डिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या घटकांच्या नॅनोफोटोनिक इंजिनिअरिंगमधील अनेक वर्षांच्या गुंतवणुकीचे फळ आहे. हे व्हर्टिकली इंटिग्रेटेड, इन-हाऊस केलेले नवोपक्रम उत्पादन क्षमता, विश्वासार्हता आणि पुरवठा यंत्रणेची स्थिरता यावर नियंत्रण मिळवण्यास आणि डिझाइन अधिक सक्षम करण्यास मदत करते. डेटाच्या अभूतपूर्व वाढीमुळे स्टोरेजची मागणी देखील वाढली आहे, अशा परिस्थितीत हे सर्व घटक अत्यंत आवश्यक आहेत. व्हर्टिकल इंटिग्रेशनमुळे पात्रता निश्चितीचा कालावधी देखील कमी होतो आणि उत्पादन खर्चाचे नियोजन अधिक अचूक करणे शक्य होते.
मोझॅक ४+ डेटा सेंटर पायाभूत सुविधेमधील आव्हानांचे कशाप्रकारे निराकरण करते
आर्टिफिशियल इंटेलिजन्स मोठ्या प्रमाणावरील ट्रेनिंग डेटा, ऐतिहासिक पुरालेख आणि एआय-निर्मित कन्टेन्टचे स्टोरेज आणि त्यामध्ये प्रवेश करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते, ज्यामध्ये मोठे व्हिडिओ आणि इतर मल्टिमोडल आउटपुट्सचा समावेश आहे. विश्वसनीय एआय वर्कलोड्स शक्य करणाऱ्या आणि वेगाने वाढणाऱ्या डेटा पूल्सना किफायतशीररीत्या साठवण्यासाठी, व्यवस्थापित करण्यासाठी आणि पुन्हा सक्रिय करण्यासाठी हायपरस्केलर्स मोठ्या क्षमतेच्या हार्ड ड्राइव्हवर अवलंबून असतात.
मोझॅक ४+ द्वारे प्रति-डिस्क क्षमतेमध्ये होणारी वाढ उच्च क्षमतेचे व किफायतशीर स्टोरेज सक्षम करते, जे पायाभूत सुविधांचा विस्तार न करता किंवा उर्जेचा वापर न वाढवता एआयच्या आर्थिक पायाला अधिक बळकट करते. हे प्लॅटफॉर्म प्रति-रॅक आणि प्रति-वॅट क्षमतेमध्ये प्रगती करत आहे, ज्यामुळे डेटा सेंटरची कार्यक्षमता सुधारते, एकूण मालकी खर्च कमी होतो आणि संस्थांना डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी व कालांतराने शाश्वत पद्धतीने पुन्हा सक्रिय करण्यासाठी मदत होते.
[1]एक एक्साबाइट डेटा तैनात करताना मोझॅक तंत्रज्ञान मानक ३० टीबी हार्ड ड्राइव्हच्या तुलनेत पायाभूत सुविधांच्या कार्यक्षमतेत जवळपास ४७ टक्क्यांनी सुधारणा करते. यामुळे डेटा सेंटरसाठी लागणारी जागा जवळपास १०० चौरस फूटांनी कमी होते आणि वार्षिक वीज वापरात साधारण ०.८ दशलक्ष किलोवॅट-तास इतकी मोठी घट होते. एआयच्या मोठ्या प्रमाणावरील कार्यामध्ये या कार्यक्षमतेमुळे मिळणारा फायदा आर्थिकदृष्ट्या अत्यंत मोलाचा ठरतो.
एआय मॉडेल्स विकसित होत आहेत आणि जेन-एआय आधारित अॅप्लीकेशन्सचे प्रमाण व क्षमता वाढत आहे. यामधून निदर्शनास येते की, एआय क्षेत्रातील प्रगती कायम ठेवण्यासाठी वास्तविक असो किंवा कृत्रिमरित्या तयार केलेला असो डेटाची मोठ्या प्रमाणात गरज आहे,” असे टेकनॅलिसिस रिसर्चचे अध्यक्ष बॉब ओ’डोनेल म्हणाले. “मोठ्या प्रमाणावरील मॉडेल ट्रेनिंग असो किंवा अत्याधुनिक फाईन-ट्युनिंग, ज्या कंपन्या एआय मॉडेल्स तयार करतात आणि वापरतात, त्यांना समजले आहे की, एचएएमआर सारखी उच्च क्षमतेची हार्ड ड्राइव्ह त्यांच्या आउटपुटच्या गुणवत्तेसाठी आणि वेगासाठी आता अत्यंत महत्त्वाची ठरली आहेत.”
उपलब्धता
सीगेटच्या जवळपास ४४ टीबीपर्यंतच्या क्षमतेच्या मोझॅक™ ४+ हार्ड ड्राइव्ह्जचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झाले आहे, ज्या दोन आघाडीच्या हायपरस्केल क्लाऊड प्रदात्यांना पाठवल्या जात आहेत. या ड्राइव्ह्जचे उत्पादन वाढेल तसे मोठ्या प्रमाणात उप
लब्ध करून देण्यात येतील.


