Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedशबरी महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी 15 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन*

शबरी महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी 15 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन*

 

 

पुणे, दि. १० (जिमाका, वृत्तसेवा): शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत एन.एस.टी.एफ.डी.सी., नवी दिल्ली यांच्या सहकार्याने राज्य शासन पुरस्कृत स्वयंरोजगार कर्ज योजना राबविण्यात येत आहेत.

शबरी शाखा कार्यालय, जुन्नर कार्यक्षेत्रात येणाऱ्या पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशीव, बीड व लातूर या जिल्ह्यांतील आदिवासी लाभार्थ्यांसाठी महिला सबलीकरण योजना, स्वयंसहायता बचत गट, कृषी व संलग्न व्यवसाय, हॉटेल-ढाबा व्यवसाय, ऑटो वर्कशॉप, स्पेअर पार्ट्स, वाहन व्यवसाय, ऑटो रिक्षा, मालवाहू रिक्षा तसेच लघुउद्योग आदी योजनांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्ह्यांतील आदिवासी समाजातील इच्छुक उमेदवारांनी www.mahashabari.in⁠ या संकेतस्थळावर १५ मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या., शाखा कार्यालय जुन्नर येथील शाखा व्यवस्थापक यांनी केले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments