लिंक: https://www.bseindia.com/corporates/download/10788/IPO%20Prior/TFL_Annexur_I_DRHP_20260309180037.pdf
ट्रुहोम फायनान्स लिमिटेड, ज्याला पूर्वी श्रीराम हाउसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते, यांनी बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे त्यांचा ड्राफ्ट रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला आहे.
3000 कोटी रु. च्या या आयपीओ मध्ये प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू असून तो एकूण 1500 कोटी रु. पर्यंत आहे तसेच प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सची 1500 कोटी रु. पर्यंतची ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे. प्रवर्तक विक्री समभागधारक मॅंगो क्रेस्ट इन्व्हेस्टमेंट लिमिटेड यांच्याकडून ऑफर फॉर सेल अंतर्गत प्रत्येकी 10 दर्शनी मूल्याचे एकूण 1500 कोटी रु. पर्यंतचे इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत.
निव्वळ उत्पन्न कंपनीच्या भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी भांडवली पाया मजबूत करण्याकरता वापरण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये व्यवसायाच्या वाढीमुळे येणारी सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्ट आणि पुढील वित्तपुरवठा यांचा समावेश आहे. तसेच आरबीआय कडून वेळोवेळी भांडवल ॲडीक्वसी संदर्भात निर्धारित केलेल्या नियामक आवश्यकतांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. निव्वळ उत्पन्न 31 मार्च 2027 आणि 31 मार्च 2028 ला समाप्त होणाऱ्या आर्थिक वर्षांच्या कालावधीत वापरण्याचा प्रस्ताव आहे.
2010 मध्ये स्थापन झालेली ट्रुहोम फायनान्स ही रिटेलवर लक्ष केंद्रित करणारी परवडणाऱ्या वाजवी किंमतीतील हाउसिंग फायनान्स कंपनी आहे. कंपनी पूर्वी श्रीराम हाउसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखली जात होती. ही श्रीराम फायनान्स लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी होती आणि डिसेंबर 2024 मध्ये न्यूयॉर्कस्थित जागतिक प्रायव्हेट इक्विटी फर्म वारबर्ग पिन्कस यांनी तिचे अधिग्रहण केले.
कंपनी सुरक्षित कर्जवितरण उत्पादनांचा व्यापक संच सादर करते. यामध्ये हाउसिंग लोन, प्रॉपर्टीच्या आधारावर कर्ज आणि इतर संबंधित योजना समाविष्ट असून याचा सरासरी तिकीट आकार 2.13 दशलक्ष रु. इतका आहे (31 डिसेंबर 2025 पर्यंत). कंपनी प्रामुख्याने विश्वासार्ह स्वयंरोजगार ग्राहकांना लक्ष्य करते आणि 19 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या महानगर तसेच टियर I, टियर II आणि टियर III शहरांमधील 216 शाखांच्या वैविध्यपूर्ण भारतभरातील वितरण नेटवर्कद्वारे त्यांना सेवा देते.
सर्वाधिक भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण कर्ज पोर्टफोलिओंपैकी एक असल्याचा ट्रुहोम फायनान्सला लाभ होत आहे. यामध्ये 31 डिसेंबर 2025 पर्यंत कोणतेही एक राज्य त्यांच्या AUM च्या 18.00% पेक्षा अधिक योगदान देत नाही. त्याच्या पोर्टफोलिओमधील तीन सर्वात मोठी राज्ये म्हणजे महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडू असून या तिन्ही राज्यांचा एकत्रित वाटा त्याच तारखेला AUM च्या 49.70% इतका आहे.
31 डिसेंबर 2025 पर्यंत कंपनीने 110,000 पेक्षा अधिक ग्राहकांना सेवा दिली आहे आणि समकक्ष कंपन्यांमध्ये स्वयंरोजगार ग्राहकांचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रमाण आहे. यात अशा ग्राहकांचे योगदान AUM च्या 76.96% इतके आहे. त्याच कालावधीत, AUM पैकी 85.32% हे 700 किंवा त्याहून अधिक CIBIL स्कोअर असलेल्या ग्राहकांकडून आले होते तसेच 94.78% कर्जांमध्ये महिलांचा अर्जदार किंवा सह-अर्जदार म्हणून समावेश होता.
31 डिसेंबर 2025 पर्यंत 21124.32 कोटी रु. च्या AUM सह कंपनी भारतातील AUM च्या आधारावर तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी परवडणारी हाउसिंग फायनान्स कंपनी आहे. आर्थिक वर्ष 25, आर्थिक वर्ष 24 आणि आर्थिक वर्ष 23 या कालावधीत AUM CAGR (48.58%) च्या आधारावर ती भारतातील सर्वात वेगाने वाढणारी परवडणारी हाउसिंग फायनान्स कंपनी असून 31 डिसेंबर 2025 पर्यंत प्रति शाखा सर्वाधिक 107.230 कोटी रु. AUM आहे. कंपनीचे AUM प्रामुख्याने हाउसिंग लोनद्वारे चालवले जाते. त्याचा एकूण AUM मध्ये 57.37% वाटा असून त्याचा सरासरी तिकीट आकार 1.91 दशलक्ष रु. आहे. प्रॉपर्टीच्या आधारावर कर्ज याचा AUM मध्ये 39.22% वाटा असून त्याचा सरासरी तिकीट आकार 2.07 दशलक्ष रु. आहे. तर इतर कर्ज उत्पादनांचा वाटा AUM मध्ये 3.41% असून सरासरी तिकीट आकार 118.82 दशलक्ष रु. आहे.
डिसेंबर 2025 ला संपलेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत (आर्थिक वर्ष 26 ची नऊमाही) कंपनीने 6382.446 कोटी रु. कर्ज वितरित केले असून आर्थिक वर्ष 25, आर्थिक वर्ष 24 आणि आर्थिक वर्ष 23 या कालावधीत डिस्बर्समेंट CAGR (31.14%) च्या आधारावर ती सर्वात वेगाने वाढणाऱ्या परवडणाऱ्या हाउसिंग फायनान्स कंपन्यांपैकी एक आहे.
कंपनीने मालमत्ता गुणवत्ता कायम राखली असून डिसेंबर 2025 पर्यंत ग्रॉस स्टेज-3 मालमत्ता 1.60% आणि नेट स्टेज-3 मालमत्ता 1.09% होती, तर 30 हून अधिक दिवसांपेक्षा जास्त थकबाकी (DPD) 3.15% इतकी होती.
ट्रुहोम फायनान्सच्या सोर्सिंग नेटवर्कमध्ये 3,000 पेक्षा अधिक इन-हाउस सेल्स कर्मचाऱ्यांकडून थेट सोर्सिंग, 6,600 कनेक्टर्स आणि 821 DSAs यांचा संतुलित समावेश आहे. 31 डिसेंबर 2025 पर्यंत, कंपनीने 48 वित्तपुरवठादारांकडून कर्ज उभारले होते. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील, खाजगी क्षेत्रातील आणि परदेशी बँका तसेच वित्तीय संस्था समाविष्ट आहेत. हे कर्ज टर्म लोन, ECBs, NHB रिफायनान्स, NCDs आणि सिक्युरिटायझेशन्स यांसारख्या साधनांद्वारे उभारले गेले.
नफा क्षमतेच्या दृष्टीने, डिसेंबर 2025 ला संपलेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत कंपनीने 333.53 कोटी रु. इतका करपश्चात नफा (PAT) नोंदवला. यामध्ये मालमत्तेवरील परतावा (RoA) 2.66% आणि इक्विटीवरील परतावा (RoE) 11.62% (आर्थिक वर्ष 26 च्या नऊमाहीसाठी वार्षिक) होता. एकूण उत्पन्न आर्थिक वर्ष 23 मध्ये 780.496 कोटी रु. वरून आर्थिक वर्ष 25 मध्ये 1905.48 कोटी रु. पर्यंत वाढले, तर करपश्चात नफा (PAT) त्याच कालावधीत जवळपास दुप्पट होऊन 137.75 कोटी रु. वरून 286.24 कोटी रु. पर्यंत वाढला. डिस्बर्समेंटची टक्केवारी म्हणून कामकाज खर्च आर्थिक वर्ष 23 मध्ये 4.87% वरून आर्थिक वर्ष 25 मध्ये 7.17% पर्यंत वाढला. हे वाढलेला कामकाज आवाका आणि व्यवसाय विस्ताराचे प्रतिबिंब आहे. कंपनीने शिस्तबद्ध अंडररायटिंग, अॅडव्हान्सेसवरील स्प्रेड आणि मजबूत मालमत्ता गुणवत्ता राखत सातत्याने मजबूत वाढ आणि कर्जवितरण नोंदवले आहे.
ट्रुहोम फायनान्सने अलीकडेच माजी एसबीआय अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांची पाच वर्षांच्या कालावधीसाठी नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. व्यवस्थापन टीमचे नेतृत्व व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुब्रमणियन जंबुनाथन (रवी सुब्रमणियन म्हणूनही ओळखले जातात) करत आहेत. त्यांना वित्तीय सेवांमध्ये 30 वर्षांपेक्षा अधिक अनुभव असून ते 2010 पासून श्रीराम समूहाशी संबंधित आहेत.
जेएम फायनान्शियल लिमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (पूर्वी आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड म्हणून ओळखले जात होते), जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड हे या इश्यूचे बँकर्स आहेत.


