Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedगुढीपाडवा निमित्त आकर्षक वाहन नोंदणी क्रमांकांसाठी लिलाव प्रक्रिया जाहीर

गुढीपाडवा निमित्त आकर्षक वाहन नोंदणी क्रमांकांसाठी लिलाव प्रक्रिया जाहीर

 

 

पुणे, दि.11 – गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर वाहन खरेदीचे प्रमाण वाढत असल्याने वाहनधारकांना आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक मिळावेत यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या वतीने नवीन मालिका सुरू करण्यात येणार असून त्यासाठी आगाऊ अर्ज व लिलाव प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

 

खाजगी चारचाकी वाहनांसाठी पसंतीचे नोंदणी क्रमांक राखून ठेवण्यासाठी इच्छुकांनी दिनांक 13 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या वेळेत विहित नमुन्यात अर्ज, डीडी, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र व पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतींसह आरटीओ कार्यालयात सादर करावेत. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार असून 16 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता लिलाव आयोजित करण्यात येईल.

 

दुचाकी वाहनांसाठी आकर्षक क्रमांकाकरिता अर्ज 16 मार्च 2026 रोजी स्वीकारले जाणार असून त्याचा लिलाव 17 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता सहकार सभागृहात करण्यात येणार आहे.

 

लिलावासाठी सादर करण्यात येणारा डीडी “R.T.O., Pune” या नावे नॅशनलाइज्ड किंवा शेड्युल्ड बँकेचा असावा व दोन महिन्यांपेक्षा जुना नसावा. अर्जासोबत पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे बंधनकारक आहे. एकाच क्रमांकासाठी एकच सीलबंद डीडी स्वीकारला जाईल.

 

महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1981 च्या नियम 54अ नुसार पसंतीचा नोंदणी क्रमांक 180 दिवसांपर्यंत वैध राहील. लिलावानंतर उर्वरित क्रमांकांसाठी प्रक्रिया https://fancy.parivahan.gov.in⁠ या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार असून इच्छुकांनी आधार संलग्नित मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करून पसंती क्रमांक आरक्षित करता येणार आहे.

 

पुणे आरटीओ कार्यक्षेत्रातील पत्ता असलेल्या वाहनधारकांचेच अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांनी दिली आहे.

 

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments