Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedगायिका सौ.मृदुला दाढे यांच्या सुश्राव्य गीतांचा कार्यक्रम* • "तरी असेल गीत हे"...

गायिका सौ.मृदुला दाढे यांच्या सुश्राव्य गीतांचा कार्यक्रम* • “तरी असेल गीत हे” संगीत कार्यक्रम •

पुणे
(प्रतिनिधी)
भारतीय मजदूर संघाशी संलग्न आलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉईज ऑर्गनायझेशनच्या महिला विभागातर्फे पुण्यात डॉ मृदुला दाढे यांचा ‘तरी असेल गीत हे’ हा सुश्राव्य गीतांचा एक अतिशय अविस्मरणीय कार्यक्रम रविवार २९ मार्च रोजी कमिन्स महाविद्यालयातील सभागृहात संपन्न झाला.
बँक ऑफ महाराष्ट्र निवृत्त संघटनेचा महिला विभाग महिला दिनाच्या निमित्ताने महिला सदस्यांसाठी दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करीत असतात.त्यातला हा एक कार्यक्रम.
कमिन्स कॉलेजच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मृदुला दाढे यांनी,दिग्गज संगीतकारांचे समृद्ध संगीत लाभलेल्या जुन्या मराठी – हिंदी गाण्यांतील शब्दांचे भाव – विभ्रम आपल्या गोड गळ्यातून उमटवत सुमारे दोन तास रसिकांना मंत्रमुग्ध केले.

‘ॐ नमोजी आद्या’ ह्या संत ज्ञानेश्वरांच्या व पं. हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबध्द केलेल्या मंगलाचरणाने कार्यक्रम सुरू झाला. त्यानंतर “तिन्हिसांजा सखे मिळाल्या”, “जीवलगा कधी रे येशील तू”, ‘ही वाट दूर जाते”, “सांग तू माझा होशील का” आणि हिंदीतील – “अब तो है तुमसे हर खुशी अपनी”, “पिया तोसे नैना लागे रे”, “दिलका भँवर करे पुकार” इत्यादी गाणी सुरेख रित्या रसिकांसमोर सादर केली. शेवटी सर्व श्रोत्यांच्या सहभागाने ‘अभी ना जाओ छोडकर’ ह्या गाण्याने सुरेल मैफिलीची सांगता झाली .
या कार्यक्रमासाठी बँक ऑफ महाराष्ट्र निवृत्त कर्मचारी संघटनेच्या निवृत्त महिला सदस्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
बँक ऑफ महाराष्ट्र निवृत्त संघटनेच्या उपाध्यक्षा सानिका खोपकर यांनी प्रास्ताविक भाषण केले. मनीषा साने आणि वीणा इतराज यांनी प्रसिद्ध गायिका डॉ मृदुला दाढे यांचे शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सत्कार केला. त्यानंतर ज्योती गोळे यांनी डॉ . मृदुला दाढे यांचा परिचय करून दिला.लता राव यांनी कार्यक्रमाचा आभार प्रदर्शनाने समारोप केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments