Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedमाहेश्वरी प्रीमियर लीगचे चार एप्रिलपासून आयोजन* दीड लाख रुपयांची पारितोषिके, नेहरू स्टेडियमवर...

माहेश्वरी प्रीमियर लीगचे चार एप्रिलपासून आयोजन* दीड लाख रुपयांची पारितोषिके, नेहरू स्टेडियमवर रंगणार स्पर्धा

पुणे : पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ (जिल्हा युवा समिती) यांच्या वतीने पुणे जिल्हा माहेश्वरी प्रीमियर लीग (पीएमपीएल) या व्हाईट लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ४ ते १२ एप्रिल २०२६ दरम्यान स्वारगेट येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे होईल. स्पर्धेत एकूण दीड लाख रुपयांची पारितोषिके असणार आहेत, अशी माहिती क्रीडा अध्यक्ष नीरज धूत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी युवा अध्यक्ष रोनक झंवर, युवा सचिव मनीष मणियार, क्रीडा सचिव गितेश झंवर, कोषाध्यक्ष हिमांशू सोनी यांच्यासह अभय करवा, संतोष जाजू, कृष्णा राठी आणि शुभम मंत्री हे पदाधिकारी उपस्थित होते.

रोनक झंवर म्हणाले, या स्पर्धेत सहा संघ सहभागी होत असून, एकूण १९ सामने खेळवले जाणार आहेत. त्यापैकी १२ सामने लीग टप्प्यात होतील. लीगचे सामने १२ षटकांचे होणार आहेत. उपांत्य फेरी ११ एप्रिल रोजी (१६ षटकांचे सामने) होणार असून, १२ एप्रिल रोजी तिसऱ्या क्रमांकाची लढत आणि अंतिम सामना पार पडणार आहे. स्पर्धेत हाय-बाइट चॅलेंजर्स, मोल्डर्स, प्रारव पँथर्स, सारडा स्टॅलियन, साईज मास्टर्स स्मॅशर्स आणि स्मॅशर योद्धाज हे संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या लढती सकाळी नऊ ते दुपारी साडेचारपर्यंत रंगणार आहेत.

विजेत्या संघाला रुपये ७१ हजार आणि उपविजेत्या संघाला रुपये ४१ हजार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्पर्धेत सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृ्ष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी इतर पारितोषिकेही दिली जाणार आहेत.

स्पर्धेसाठी बेहडे बिल्डकॉन एलएलपी निशांत बेहडे व परिवार हे मुख्य प्रायोजक असून, त्यांनी सलग दुसऱ्या वर्षी स्पर्धेला पाठिंबा दिला आहे. मेटारोल श्रीमती राधिका बिर्ला हे को-टायटल स्पॉन्सर आहेत. बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. हे व्हेन्यू स्पॉन्सर, जीबी ग्रुप गणेश भुतडा ट्रॉफी स्पॉन्सर, तर मॅजेस्टिक लँडमार्क कैलाश मुंदडा जर्सी स्पॉन्सर म्हणून सहभागी आहेत. याशिवाय डीडब्ल्यू रिअल्टर्स अँड लॉ फर्म, स्वनिती, तिरुपती सेल्स एम्पोरियम आणि अरुणकुमार अँड कंपनी हे असोसिएट स्पॉन्सर्स म्हणून सहभागी झाले आहेत. दरम्यान, टायटल स्पॉन्सर बेहडे बिल्डकॉन एलएलपी यांनी सलग दुसऱ्या वर्षी दिलेल्या पाठिंब्यामुळे यंदाची पीएमपीएल स्पर्धा अधिक भव्य, उत्कृष्ट आणि दमदार होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments