Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorized७१ भारतीयांची घरातील लिव्हिंग रुमला सर्वाधिक पसंती; इंटेरियो बाय गोदरेजच्या ‘मोमेंट्स दॅट...

७१ भारतीयांची घरातील लिव्हिंग रुमला सर्वाधिक पसंती; इंटेरियो बाय गोदरेजच्या ‘मोमेंट्स दॅट मॅटर’ हा अहवाल प्रसिद्ध

दिल्ली, लखनऊ, हैदराबाद, बंगळुरु, कोलकाता, गुवाहाटी, मुंबई आणि अहमदाबाद या आठ प्रमुख शहरांतील ग्राहकांचे आपल्या घरातील प्रत्येक भागाबद्दलचे मत ‘मोंमेंट्स दॅट मॅटर’ या अहवालात प्रसिद्ध करण्यात आले आहे.
२७ मार्च, २०२६: गोदरेज एंटरप्रायझेस समूहातील एक अग्रगण्य फर्निचर ब्रँड, इंटेरियो बाय गोदरेजने आज भारतीय ग्राहकांचे घरातील तसेच कार्यालयातील मानसिक आरोग्य, परस्पर संबंध आणि आरामदायी जीवनशैली या तीन प्रमुख मुद्द्यांवर आधारित ‘मोमेंट्स दॅट मॅटर’ नावाचा विशेष अहवाल प्रसिद्ध केला आहे. रोजच्या दिनश्चर्येचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या या जागांवर भारतीयांच्या झोपेच्या सवयी, स्वयंपाक करणे, स्वतःला दिला जाणारा अमूल्य वेळ या महत्त्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
मोमेंट्स दॅट मॅटर या अहवालाबाबत इंटेरियो बाय गोदरेजच्या वरिष्ठ उपाध्यक्ष आणि ग्राहक व्यवसाय प्रमुख डॉ. देव नारायण यांनी माहिती दिली. ते म्हणाले,” ‘मोमेंट्स दॅट मॅटर‘ हा केवळ संशोधनात्मक अहवाल नसून, या अभ्यासात भारतीय ग्राहकांचा आपल्या घराच्या आणि कामाच्या ठिकाणाच्या रचनेचा दृष्टीकोन मांडण्यात आला आहे. ते या जागा भविष्यात कसे पाहतात, याची माहिती देण्यात आली आहे. आजच्या धावत्या जगात, घरे आणि कार्यालये केवळ भौतिक वास्तू म्हणून मर्यादित राहिलेली नाहीत. ही ठिकाणे उत्तम आरोग्य, परस्पर संबंध आणि स्वतःला व्य्क्त करण्याची महत्त्वाची केंद्रे बनली आहेत. या अभ्यासातून आम्ही भारतीयांचे त्यांच्या राहणीमानाशी बदलत जाणारे नाते समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आमची ही वचनबद्धता या अभ्यासातून अधोरेखित होते. आधुनिक भारतीय ग्राहकांच्या दैनंदिन अनुभवामध्ये आमच्या फर्निचरची मोलाची साथ मिळेल. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण अधिक समृद्ध होतील. आमच्या ग्राहकांच्या राहणीमानात सकारात्मक बदल घडवणून आणणे हे आमचे ध्येय आहे.“
आजच्या धावपळीच्या तणावग्रस्त जीवनशैलीत भारतीय ग्राहकांसाठी आपले घर भावनिक आधारस्तंभ असते. अनेकांना घरातून आपलेपणा मिळतो. धावत्या जीवनशैलीतही संतुलन राखता येते, असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष या अहवालातून मांडण्यात आला आहे. घरातील बेडरुम हा प्रत्येकासाठी भावनिक दृष्टीकोनातून महत्त्वाचा कोपरा असतो. अहवालातील ९० टक्के माणसांनी बेडरुम हे आराम आणि विश्रांतीसाठी तसेच ताजेतवाने होण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले आहे. स्वतःच्या बेडवर झोपणे हे घरात व्यतीत केलेल्या आनंदाच्या क्षणांपैकी मौल्यवान क्षण असल्याचे मत ५४ टक्के लोकांनी व्यक्त केले.
घरातील स्वयंपाकघराविषयीही अनेकांनी मते मांडली. स्वयंपाकघर हे केवळ जेवण बनवण्याची जागा नसून, भावनिक आधार देणारी जागा असल्याचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष या अभ्यासातून मांडण्यात आला आहे. घरात एकट्याने किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत स्वयंपाक करणे हे मानसिक शांतता देण्यासह, परस्परांशी जवळीक साधण्यात मदत करते, असे ९७ टक्के लोकांनी सांगितले. अनेकांच्या मते, लिव्हिंग रुम, डायनिंग रुम हे घरातील सामाजिक केंद्र असून, येथे गप्पागोष्टी आणि हास्यविनोद घडतात. या भागांत कुटुंबातील सदस्ये एकमेकांशी जोडले जातात.
शहरांतील घरांमध्ये बाल्कनी आता केवळ मोकळ्या जागेपुरती मर्यादित राहिलेल्या नाहीयेत. अनेकांना बाल्कनीमध्ये शांतता लाभते, असा मुद्दा या अभ्यासातून मांडण्यात आला आहे. शहरातील धावत्या जीवनशैलीतून निवांत विरंगुळा हवा असल्यास बाल्कनी कामी येते, असे चारपैकी ३ सदस्यांचे मत आहे. ही जागा मनःशांती आणि जगण्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन देते. ५३ टक्के लोकांच्या मते, बाल्कनीतील सकाळचे क्षण शांततेने दिवसाची सुरुवात करण्यासाठी मदत करतात. या ठिकाणी सकाळी वेळ व्यतीत केल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments