Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedTATA.ev ने फिअरलेस + QWD 75 दाखल करत Harrier.ev मधील क्वाड व्हील...

TATA.ev ने फिअरलेस + QWD 75 दाखल करत Harrier.ev मधील क्वाड व्हील ड्राइव्ह अधिक सुलभ केले

– ग्राहक आता XXXX इतक्या प्रारंभिक किंमतीत सुपरकार सारखा बेजोड परफॉर्मन्स आणि भारताच्या सर्वात दमदार, स्वदेशी SUV च्या कुठेही जाण्याच्या ऑफ-रोड क्षमतेचा आनंद अनुभवू शकतात ₹26.49 Lakh ex-showroom

मुंबई, 21 मार्च 2026: TATA.ev या भारताच्या सर्वात मोठ्या 4-व्हीलर EV उत्पादक कंपनीने आज भारताच्या सर्वात दमदार, संपूर्ण स्वदेशी SUV Harrier.ev साठी संपूर्ण नवीन फिअरलेस+ QWD 75 पर्सोना सादर केली. या लॉन्चसह जाणकार ग्राहक आता Harrier.ev चा सुपरकार सारखा बेजोड परफॉर्मन्स आणि ड्युअल मोटर क्वाड व्हील ड्राइव्हसह मिळणारी कुठेही जाण्याची ऑफ-रोड क्षमता अनुभवू शकतात आणि ती देखील ₹26.49 Lakh ex-showroom रु. इतक्या किफायती एक्स-शोरूम किंमतीत.

acti.ev+ शुद्ध EV आर्किटेक्चरवर विकसित केलेली Harrier.ev फिअरलेस+ QWD 75 आकर्षक 504 Nm टॉर्क देते आणि 6.3 सेकंदांत ताशी 0 ते 100 किमी वेग गाठू शकते. त्यामुळे सर्व प्रकारच्या ड्रायव्हिंग परिस्थितींमध्ये तत्काळ वेग आणि नेमके नियंत्रण साधणे या गाडीला शक्य आहे. यामध्ये सहा टेरेन मोड आणि त्यांच्या जोडीला ऑफ-रोड असिस्ट आणि बूस्ट मोड आहे. ड्युअल-मोटर क्वाड व्हील ड्राइव्ह सिस्टम ट्रॅक्शन व स्थिरता आणखी वाढवते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भू-प्रदेशांत तसेच प्रत्यक्ष जगातील रोड स्थितींमध्ये आत्मविश्वासपूर्ण कामगिरी करते.

फिअरलेस+ QWD 75 आरामदायकता आणि टेक्नॉलॉजी फीचर्सची सुंदर सांगड घालते. यामध्ये मेमरीसह 6-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट, 4-वे पॉवर्ड को-ड्रायव्हर सीट आणि फ्रंट व्हेंटिलेटेड सीटचा समावेश आहे. ही गाडी 360-डिग्री कॅमेरा, JBL ब्लॅक 10-स्पीकर ऑडिओ सिस्टम, R19 अलॉय व्हील्स आणि व्हॉईस-असिस्टेड ड्युअल-झोन संपूर्ण ऑटोमॅटिक तापमान नियंत्रणाने सुसज्ज आहे. इतर फीचर्समध्ये अम्बियन्ट लायटिंग, रियर-रो कम्फर्ट हेड-रेस्ट आणि रियर विंडो सनशेड्सचा समावेश आहे, ज्यांच्यामुळे एक संतुलित दैनंदिन ड्रायव्हिंग अनुभव सुनिश्चित होतो.

शिवाय, ग्राहकांच्या संपूर्ण मनःशांतीसाठी Harrier.ev फिअरलेस+ QWD 75 मध्ये आजीवन बॅटरी वॉरंटी देखील देऊ करण्यात आली आहे, जी मालकीचा सहज अनुभव देते. यात भर म्हणून, याला मिळालेले 5-स्टार भारत-NCAP प्रमाणपत्र हा तर गाडीतून प्रवास करणाऱ्या लोकांच्या सुरक्षेप्रती टाटा मोटर्सच्या कटिबद्धतेचा ठळक पुरावाच आहे.

क्वाड व्हील ड्राइव्ह टेक्नॉलॉजी ग्राहकांसाठी सहजप्राप्य बनवण्याबाबत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे चीफ कमर्शियल ऑफिसर श्री. विवेक श्रीवत्स म्हणाले, “Harrier.ev ला आमच्या ग्राहकांकडून जे प्रेम मिळाले आहे, ते आम्हाला रोमांचित करणारे आहे. अवघ्या 6 महिन्यांत 13,000 पेक्षा जास्त Harrier.ev ची डिलिव्हरी देण्यात आली आहे. Harrier.ev च्या क्षमतेला आणि सामर्थ्याला ग्राहकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे आणि ग्राहकांनी या गाडीच्या ‘कुठेही जाण्याच्या’ क्षमतेचा पुरेपूर वापर करत समस्त भारताच्या काना-कोपऱ्यापर्यंत 100 मिलियनपेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास केला आहे. आम्ही परफॉर्मन्स SUVs कशा प्रकारे आकर्षक आणि तरीही सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणाऱ्या बनवत आहोत याचा प्रत्यय यामधून मिळतो. फिअरलेस पर्सोनामध्ये अत्यंत वाखाणली गेलेली ड्युअल-मोटर क्वाड व्हील ड्राइव्ह टेक्नॉलॉजी दाखल करून आम्हाला ही सहजप्राप्यता आता आणखी पुढे घेऊन जायची आहे. यासाठी आम्ही अधिक मूल्य प्रदान करत, Harrier.ev सोबत ‘डिलीट-इम्पॉसिबल’ करण्याचा अनुभव घेण्यासाठी अधिकाधिक ग्राहकांना आमंत्रित करत आहोत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments