पुणे समर्थ पथ कर्वेनगर येथील पूर सदृश परिस्थिती बाबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी पुणे मनपा आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. समर्थ पथ कर्वेनगर येथे प्रतिज्ञा मंगल कार्यालय परिसरात 2023 मध्ये झालेल्या मुसळधार पावसात पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली होती.इतकी की स्वतः मनपा आयुक्त विक्रमकुमार यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली व चिंतामणी, मोरेश्वर, राहुल कॉम्प्लेक्स, गंगानगरी व इतर इमारतीं मध्ये घुसलेले पाणी काढण्यासाठी पुरेशी यंत्रणा तर लावलीच पण स्वतः 4 तास तेथे थांबून होते. त्या भागातील आजची परिस्थिती ही पुन्हा पूर सदृश आहे आणि त्याच बरोबर इमारतीतील विजेच्या मीटर पर्यंत पाणी शिरल्याने लाईट बंद करण्याची वेळ आलीये.
2023 ला मनपा आयुक्तांनी कबूल केल्याप्रमाणे येथे मोठ्या व्यासाची पावसाळी लाईन टाकण्याचे काम झाले मात्र आश्चर्यकारकरीत्या 100 मीटर चे काम न झाल्याने पुन्हा एकदा येथील नागरिक अडचणीत आहेत.
सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे मनपा ची यंत्रणा हलवील्यावर वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे यांची टीम तेथे पोहोचली व त्यांनी अडकलेला कचरा काढल्यावर लगेचच पाण्याचा निचरा झाला.
याचाच अर्थ सफाई चे कोट्यावधी पाण्यात गेले आणि त्याचा त्रास मात्र करदाते पुणेकर भोगत आहेत.
तरी ह्या “सफाई” ची चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई करतानाच येता पावसाळा सुखावह कसा होईल यासाठी योजना आखून पुढील तीन महिन्यात त्याची अंमलाबजावणी करावी अशी आग्रही मागणी करत आहे.
समर्थ पथ कर्वेनगर येथील पूर सदृश परिस्थिती बाबत संदीप खर्डेकर यांचे मनपा आयुक्तांना निवेदन.
RELATED ARTICLES


