Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedएमआयटी डब्ल्यूपीयुत निर्मिती - २६ चे उद्घाटन ८ रोजी सिव्हिल इंजिनिअरिंग...

एमआयटी डब्ल्यूपीयुत निर्मिती – २६ चे उद्घाटन ८ रोजी सिव्हिल इंजिनिअरिंग विभागा तर्फे “द राईज् ऑफ इंडियाज् मेगा स्ट्रक्चर” या विषयावर आधारित

पुणे, ६ एप्रिल: . “द राईज् ऑफ इंडियाज् मेगा स्ट्रक्चर” या विषयाला अनुसरून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागा तर्फे दोन दिवसीय निर्मिती – २६ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ८ एप्रिल रोजी होणाऱ्या निर्मिती- २६ चे उद्घाटन सकाळी ९.३० वा. कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयु च्या प्रांगणात होईल. तसेच, कार्यक्रमाचा समारोप दि. ९ एप्रिल रोजी दुपारी ४ वा. कोथरूड कॅम्पस मध्ये संपन्न होणार आहे.

उद्घाटन प्रसंगी क्रेडाई चे सदस्य शांतीलाल कटारिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. तसेच, सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. शांतीनी बोकील, डॉ. रोहित सालगुडे, डॉ.प्रवीण मिंडे यांची प्रमुख उपस्थिती असेल.

एमआयटी वर्ल्ड पीस यूनिवर्सिटी चे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या शुभ आशीर्वादाने आणि एमआयटी डब्ल्यूपीयुचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे.

सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आदित्य होले व त्याच्या सहकाऱ्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.

निर्मिती २०२६ या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे पेपर प्रेझेंटेशन, टेक्नो क्विझ, बॉब द बिल्डर, बॉक्स क्रिकेट, ट्रेझर हंट, सीव्ही क्रुट्स, ई टेंडरिंग सारख्या वैविध्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व स्पर्धा बांधकाम क्षेत्राशी निगडित आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण दीड लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला संपूर्ण राज्यातील बांधकाम क्षेत्राशी निगडित नामांकीत व्यक्ती भेट देणार आहेत त्याचप्रमाणे मगरपट्टा सिटी चे संस्थापक अध्यक्ष सतीश मगर यांची पण विशेष भेट असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments