Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहर्षी न्यायरत्न धुंडीराजशास्त्री विनोद यांच्या रेखाचित्राचे अनावरण

महर्षी न्यायरत्न धुंडीराजशास्त्री विनोद यांच्या रेखाचित्राचे अनावरण

प्रेस-नोट

पुणे (प्रतिनिधी)
महान तत्त्वज्ञ,विचारवंत,गूढवादी, योगी,स्वातंत्र्यसैनिक,लेखक आणि संत महर्षी न्यायरत्न धुंडीराजशास्त्री विनोद यांच्या रेखाचित्रकार मिलिंद रथकंठीवार यांनी रेखाटलेल्या चित्राचे अनावरण सोमवारी स.प.महाविद्यालयाजवळील ‘शांती मंदिर’ या विनोद त्यांच्या वास्तूमध्ये औपचारिक समारंभात झाले.
महर्षी विनोद यांचा उज्ज्वल अध्यात्मिक वारसा पुढे चालवणारे आत्मयोगगुरु यांच्या हस्ते रेखाचित्राचे अनावरण करण्यात आले.यावेळी मिलिंद रथकंठीवार,राष्ट्रीय बुद्धिबळपटू प्रकाश देशपांडे,माध्यम प्रतिनिधी विश्वास खोड आदी उपस्थित होते.
महर्षी न्यायरत्न धुंडीराज शास्त्री विनोद यांनी ‘जागतिक शांती दूत’ म्हणून जगभर प्रवास केला.महर्षी विनोद हे डॉ अल्बर्ट आईन्स्टाईन,बर्ट्रांड रसेल, रवींद्रनाथ टागोर,महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू,डॉ.राजेंद्र प्रसाद आणि भगतसिंग यांच्याशी जवळून संबंधित होते.
लेखक,गायक,रेखाचित्रकार आदी कलांमध्ये पारंगत व विविध पुरस्काराने सन्मानित मिलिंद रथकंठीवार यांचे वर्णन ‘ व्यक्ती एक अभिव्यक्ती अनेक ‘ असे केले जाते.त्यांनी देश-विदेशातील प्रसिद्ध व्यक्तींची रेखाचित्रे रेखाटली आहेत.अटल बिहारी वाजपेयी,एपीजे अबुल कलाम,अमिताभ बच्चन,जयंत नारळीकर,रिचर्ड हेंडरसन,आर के लक्ष्मण,नरेंद्र मोदी,किशोर कुमार,आशा भोसले,लता मंगेशकर इत्यादी अनेक दिग्गजांचा त्यात समावेश आहे.
आजपर्यंत त्यांनी तीनशेहून अधिक रेखाचित्रे रेखाटली असून संबंधित व्यक्तींची किंवा त्यांच्या वंशजांची स्वाक्षरी घेऊन त्यांचा अनोखा संग्रह करून अनेक प्रदर्शने भरवलेली आहेत.
________________

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments